कोणालाही द्या! पण डिचोलीत 500 नोकऱ्या द्या Dainik Gomantak
गोवा

कोणालाही द्या! पण डिचोलीत 500 नोकऱ्या द्या

कोणालाही द्या, परंतु डिचोलीत 500 नोकऱ्या हव्यात, काँग्रेसची मागणी काँग्रेसतर्फे उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुखमंत्र्यांना निवेदन

दैनिक गोमन्तक

डिचोली: कोणालाही द्या, परंतु सरकारने (Goa Government) जाहीर केलेल्या 10 हजार नोकऱ्यांपैकी डिचोली (Bicholim) मतदारसंघात किमान 500 नोकऱ्या (Job) द्या. अशी मागणी डिचोली गट काँग्रेसने (Congress) केली आहे. लाटंबार्से औद्योगिक वसाहतीला त्वरित चालना देऊन 80 टक्के स्थानिकांना रोजगाराची संधी द्यावी. तसेच डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात दर्जात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करा. अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे डिचोलीतील संभाव्य उमेदवार मेघ:श्याम राऊत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी तसे निवेदन काल गुरुवारी उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांना दिले आहे. निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात काँग्रेसच्या उत्तर गोवा समितीचे नझिर बेग,डिचोली गट काँग्रेसचे अध्यक्ष अर्जुन (नितीन) परब, महिला गट काँग्रेसची अध्यक्ष मारिया (जेनेट) सौझा, बालाखान गौरी आणि उमेश गाड यांचा समावेश होता.

गरजवंतांना नोकऱ्या द्या

डिचोली मतदारसंघात बेरोजगारीची समस्या मोठी असून, अनेक सुशिक्षित रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यात दहा हजार नोकऱ्या देण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यानुसार सरकारने पालिकेसह प्रत्येक पंचायतीत मिळून डिचोली मतदारसंघात किमान 500 नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात. या नोकऱ्या कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या तरी चालतील, मात्र त्या देताना गरज आहे, त्यांना अगोदर प्राधान्य द्या. अशी मागणी मेघ:श्याम राऊत यांनी केली आहे.

आयडीसीला चालना द्या

मतदारसंघातील लाटंबार्से पंचायत क्षेत्रात औद्योगिक वसाहत उभी राहणार आहे. मात्र या वसाहतीत अद्याप एकही प्रकल्प आलेला नाही. औद्योगिक वसाहतीला लवकरात लवकर चालना देतानाच 80 टक्के रोजगार स्थानिकांना उपलब्ध करून द्यावा. अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT