Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कुटुंबांच्या भांडणात आणली तलवार! Video Viral झाल्यामुळे पोलिसांची तारांबळ; संबंधिताविरोधात गुन्हा नोंद

Zuarinagar Vasco Crime: झुआरीनगर-वास्को येथे सोमवारी (ता.१४) सकाळी दोन कुटुंबांमध्ये झालेल्या बाचाबाचीप्रसंगी एकाने घरातील तलवार आणल्याने वातावरणातील तणाव वाढला.

Sameer Panditrao

वास्को: झुआरीनगर-वास्को येथे सोमवारी (ता.१४) सकाळी दोन कुटुंबांमध्ये झालेल्या बाचाबाचीप्रसंगी एकाने घरातील तलवार आणल्याने वातावरणातील तणाव वाढला. मात्र, इतरांनी हस्तक्षेप करीत त्याची तलवार काढून घेतल्याने तणाव निवळला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वेर्णा पोलिसांनी दखल घेताना त्या तलवारबहादुराविरोधात गुन्हा नोंद केला आहे. इतरांचीही चौकशी सुरू आहे.

झुआरीनगर येथील एक विवाहित जोडपे लग्नानंतर हरिद्वार येथे फिरण्यास गेले होते. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबाला माहिती मिळाली. आपल्या मुलीला तेथे साध्वी करण्यासाठी नेण्यात आले, अशी गैरसमजूत करून मुलीच्या कुटुंबाने मुलाच्या कुटुंबाला सोमवारी सकाळी जाब विचारला.

यावेळी तेथे वाद निर्माण झाल्यावर बाचाबाची सुरू झाली. ही बाचाबाची रस्त्यावर सुरू असल्याने तेथे गर्दी जमली. त्यातच मुलीच्या कुटुंबातील एकाने घरातील एक गंजलेली तलवार आणली. त्यामुळे तणावात भर पडली. मात्र, तेथे काही विपरित घटना घडण्यापूर्वीच काहीजणांनी त्याच्या हातातील तलवार काढून घेतली. त्यानंतर काही वेळाने दोन्ही कुटुंबे शांत झाली.

संबंधिताविरोधात गुन्हा नोंद

या घटनेचा कोणीतरी व्हिडिओ व्हायरल केला. याप्रकरणी त्या व्यक्तीने तलवार आणल्याने तेथे इतरांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याने त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. त्या व्यक्तीला योग्य सोपस्कारानंतर अटक करण्यात येईल, असे वेर्णा पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

SCROLL FOR NEXT