Zuarinagar Accident Dainik Gomantak
गोवा

ट्यूशन संपल्यावर सायकलवरून निघाला घरी; झुआरीनगर येथे भरधाव ट्रकने दिली धडक, विद्यार्थी गंभीर जखमी

अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे.

Pramod Yadav

Zuarinagar Accident: ट्यूशन संपल्यावर सायकलवरून घरी निघालेल्या विद्यार्थ्याला भरधाव ट्रकने धडक दिली आहे. या धडकेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे.

आग्नेल परेरा (वय 14, रा. झुआरीनगर) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिकवणी संपल्यानंतर आग्नेल सायकलवरून घरी जात होता. झुआरीनगर येथे धरभाव येणाऱ्या ट्रकने त्याच्या सायकला जोराची धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला आहे. स्थानिकांनी त्याला उपचारासाठी तात्काळ गोमेकॉत दाखल केले आहे.

अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे.

अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेईना

बाणस्तारी, वार्का -काणका, आगशी आणि आता झुआरीनगर असे अपघात मागील चार दिवसांच्या काळात नोंदवले आहेत. बाणस्तारी येथी अपघातात तीन जाणांचा बळी गेला, तर तीन जण जखमी झाले आहे. वार्का -काणका, आगशी येथील अपघात किरकोळ असले तरी चालक मद्याच्या नशेत होते असे आढळून आले.

बाणस्तारी, वार्का -काणका, आगशी येथील अपघातात चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवसांत राज्यात नोंदवलेल्या अपघातांच्या घटना चिंतेचा विषय ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT