Zuarinagar Birla  Dainik Gomantak
गोवा

Vasco News : बिर्ला-झुआरीनगर येथील आणखी 46 बांधकामे पाडली

Vasco News : वेर्णा पोलिस निरीक्षक नेल्सन कोलाको यांच्या नेतृत्वाखाली पोलिस यावेळी स्थितीवर लक्ष ठेवून होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News : वास्को, बिर्ला-झुआरीनगर येथील झुआरीनगर पोलिस चौकीच्या मागील बाजूस असलेल्या सांकवाळ कोमुनिदादच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेली ६४ पैकी सुमारे १८ बांधकामे बुधवारी जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर उरलेली बांधकामे हटवण्याची कारवाई आज गुरुवारी सकाळी सुरू करून उर्वरित ४६ बांधकामे पाडण्यात आली, अशी माहिती सांकवाळ कामुनिदादचे अध्यक्ष प्रताप म्हार्दोळकर यांनी दिली.

बेकायदेशीर बांधकामे हटवताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. वेर्णा पोलिस निरीक्षक नेल्सन कोलाको यांच्या नेतृत्वाखाली पोलिस यावेळी स्थितीवर लक्ष ठेवून होते.

बेकायदेशीर बांधकामे पाडण्याच्या मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी मामलेदार आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारीही उपस्थित होते. काही घरमालकांनी त्यांच्या वास्तू पाडण्याला स्थगिती मिळावी यासाठी न्यायालयात धाव घेतली, परंतु त्यांचे काहीच चालले नाही.

सांकवाळ कोमुनिदादच्या सर्वे क्रमांक १५४/१ व ९०/१ जमिनीवर अतिक्रमण करून सुमारे ६४ घरे उभी राहिली होती. ही बांधकामे हटविण्याबाबत कोमुनिदादचे ॲटर्नी जयेश फडते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT