Zuarinagar Student Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: झुआरीनगर परिसरात भीषण अपघात! बाईक, टँकरमध्ये धडक; 26 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, एकजण गंभीर

Zuarinagar Accident Student Death: गोव्यातील झुआरीनगर परिसरात शनिवारी घडलेल्या भीषण अपघातात बिट्स पिलानीमध्ये शिकणाऱ्या २६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

Sameer Panditrao

गोव्यातील झुआरीनगर परिसरात शनिवारी घडलेल्या भीषण अपघातात बिट्स पिलानीमध्ये शिकणाऱ्या २६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून आणखी एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

झुआरीनगर येथील आयएव्ही जंक्शनजवळ हा अपघात घडला. वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास येथील आयएव्ही प्रायव्हेट लिमिटेड जंक्शन परिसरात ही दुर्घटना घडली.

या प्रकरणातील आरोपी टँकर चालक पेद्रो इव्हो मेडेरा (६६), राया-सासष्टी येथील रहिवासी असून तो टँकर घेऊन उपासनगरहून बिर्ला येथील बिट्स पिलानीच्या दिशेने जात होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएव्ही जंक्शनजवळ पोहोचल्यावर चालकाने अचानक उजवीकडे वळण घेत कंपनीच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

त्याच वेळी बिर्लाहून वेर्णा दिशेने येत असलेली दुचाकी टँकरच्या मागील डाव्या बाजूस जोरात धडकली. या दुचाकीवर कर्नाटकातील म्हैसूरचा रहिवासी करण नरसिंहा मूर्ती आणि फोंड्यातील शांतिनगरचा रहिवासी सोहम अधिकारी (२६) हे दोघे विद्यार्थी प्रवास करत होते.

अपघात इतका जोराने झाला की दोघांनाही गंभीर दुखापत झाली. तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, करण नरसिंहा मूर्ती याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सोहम अधिकारी याच्यावर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१, १२५(ब) आणि १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी चालक पेद्रो मेडेरा याला अटक करण्यात आली होती, मात्र नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले आहे.

या अपघाताचा तपास वेर्णा पोलीस ठाण्याचे पीएसआय केरी फर्नांडिस करत असून, पीआय आनंद शिरोडकर यांच्या देखरेखीखाली आणि मुरगावचे उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात वाहतूक सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT