Zuari Bridge to be completed soon Dainik Gomantak
गोवा

झुआरी पूल मे अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता

नवीन झुआरी पुलाच्या भागाचे 90 टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण

दैनिक गोमन्तक

पणजी : नवीन झुआरी पुलाचा एक चौपदरीकरण झालेला भाग एप्रिल अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाला कोरोना काळात साहित्याच्या तुटवड्यासह अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. नवीन झुआरी पुलाच्या एका भागाचे 90 टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले असून मे महिन्यात पुलाची लोड चाचणी केली जाईल, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

झुआरी पुल (Zuari Bridge) वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वी त्याची लोड चाचणी केली जाईल. मे अखेरपर्यंत हा चौपदरीकरण झालेला मार्ग वाहतुकीसाठी सज्ज होईल. मात्र या तयार झालेल्या पट्ट्याचे उद्घाटन केव्हा करायचे हे सरकारकडून जाहीर करण्यात येणार आहे. या पुलावरुन चारचाकींबरोबरच दुचाकीही जाऊ शकतील का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अन्यथा अटल सेतूसारखाच या पुलावरुनही दुचाकींना प्रतिबंध करण्यात येण्याची शक्यता आहे.

दुचाकी वाहनांसाठी पूल वापरणे सुरक्षित आहे की नाही याविषयी पुलाच्या युरोपियन डिझायनर्सचा सल्ला घेतला जाईल. उंची आणि जोरदार वारा यामुळे दुचाकींना पुलावरुन जाण्यास बंदी घातली जाऊ शकते, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. नवीन पुलाचा दुसरा चौपदरीकरणाचा टप्पा 2022 च्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

गोवा मुक्तीच्या 60व्या वर्षाचे औचित्य साधून 19 डिसेंबर 2021 पर्यंत नवीन पुलाच्या एका चौपदरीकरण झालेल्या टप्प्याचे उद्घाटन करण्याची योजना राज्य सरकारने (Goa Government) आखली होती. मात्र कोविड निर्बंधांमुळे, परदेशातील तज्ज्ञ पुलाच्या कामावर देखरेख करण्यासाठी वेळेत भारतात जाऊ शकले नाहीत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते की, हा पूल सप्टेंबर 2022 पर्यंत सर्व बाबींमध्ये पूर्ण होईल. हे लक्ष्य आता डिसेंबर अखेरपर्यंत पुढे ढकलले गेले आहे.

आठ पदरी नवीन झुआरी पूल 2,700 कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून उत्तर आणि दक्षिण गोव्याला (South Goa) जोडणारा द्रुतगती मार्ग म्हणून नियोजित आहे. नवीन पुलाकडे जाणारे रस्ते एका बाजूला बांबोळी क्रॉस आणि दुसऱ्या बाजूला वेर्णा औद्योगिक वसाहतीपर्यंत पसरतील. याची एकूण व्याप्ती 13.6 किमी अंतर असेल. एकदा पूर्ण झाल्यावर कोलकाता येथील विद्यासागर सेतू नंतर झुआरी पूल देशातील लांबीच्या दृष्टीने दुसरा सर्वात मोठा केबल पूल असेल. भोपाळस्थित दिलीप बिल्डकॉनद्वारे या पुलाच्या बांधकामाचं काम सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT