Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Cocaine smuggling: 43 कोटींचे कोकेन तस्‍करी प्रकरण! झिम्‍बाब्‍वेच्या विद्यार्थ्याला जामीन; म्‍होरक्‍या अजूनही फरार

Goa Drugs Case: तस्‍करी प्रकरणातील म्‍होरक्‍या असलेला संशयित अजून फरार आहे आणि मांग्‍वाना याचा त्‍याच्‍याशी संबंध होता. संशयितांचा शोध सुरू आहे. पण या संशयिताबाबत मांग्‍वाना पोलिसांना सांगत नाही.

Sameer Panditrao

Goa drug smuggling गोवा क्राईम ब्रँचने केलेल्‍या कारवाईत उघडकीस आलेल्‍या ४३.२० कोटी रुपये किंमतीच्‍या कोकेन तस्‍करी प्रकरणातील झिम्‍बाब्‍वे या देशातील संशयित असलेला तारियो ब्राईटमोर मांग्‍वाना या २४ वर्षीय विद्यार्थ्याला दक्षिण गोव्‍याच्‍या अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश पूजा कवळेकर यांनी जामिनावर सोडण्‍याचा आदेश दिला.

यापूर्वी या प्रकरणात डलँड-सडा वास्‍को येथील रेश्‍‍मा सलीम वाडेकर (३९) व तिचा पती मंगेश वाडेकर या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. त्‍या दोघांनी आपल्‍याला जामिनावर मुक्‍त करावे यासाठी केलेला अर्ज याच न्‍यायालयाने फेटाळून लावला होता.

या प्रकरणात केरळ येथील निबू व्‍हिसेन्‍त या मूळ केरळी तसेच गुजरात येथील चिराग रमेशभाई दुधात यालाही अटक केली होती.या तस्‍करीत हात असल्‍याच्‍या आरोपाखाली क्राईम ब्रँचने गुजरात विद्यापीठाचा विद्यार्थी असलेल्‍या झिम्‍बाब्‍वेच्‍या मांग्‍वाना यालाही अटक करण्‍यात आली होती.

या तस्‍करी प्रकरणातील म्‍होरक्‍या असलेला संशयित अजून फरार आहे आणि मांग्‍वाना याचा त्‍याच्‍याशी संबंध होता. संशयितांचा शोध सुरू आहे. पण या संशयिताबाबत मांग्‍वाना पोलिसांना सांगत नाही. त्‍यामुळे त्‍याचा जामीन रद्द करावा, अशी मागणी क्राईम ब्रँचतर्फे करण्‍यात आली होती.

चौकशीसाठी हजेरी!

मात्र फरार संशयित मिळत नाही, या कारणामुळे मांग्‍वाना याला कोठडीत ठेवता येत नाही, असे स्‍पष्‍ट करीत न्‍या. कवळेकर यांनी हा जामीन मंजूर केला. संशयिताने १५ दिवस पोलिसांसमोर चौकशीसाठी हजेरी लावावी आणि न्‍यायालयाच्‍या परवानगीशिवाय गोवा सोडून दुसरीकडे जाऊ नये, अशा अटी त्‍याला घालण्‍यात आल्‍या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT