Theft Dainik Gomantak
गोवा

Goa Theft: दरवाजा तोडून चोरटे घुसले, पुण्यातील पर्यटकाचा 1.85 लाखांचा ऐवज पळवला; लॅपटॉप, टॅब्लेट, मोबाईलही लंपास

Zalor Theft: झालोर बीच करमणे येथे एका फ्लॅटमध्ये राहणाऱ्या मूळ पुणे येथील पर्यटकाला चोरट्यांनी दणका देत १ लाख ८५ हजारांचा ऐवज पळविला.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: किनारी भागात पर्यटकांना हेरून लुबाडण्याच्या घटना घडू लागल्या असून झालोर बीच करमणे येथे एका फ्लॅटमध्ये राहणाऱ्या मूळ पुणे येथील पर्यटकाला चोरट्यांनी दणका देत १ लाख ८५ हजारांचा ऐवज पळविला.

या प्रकरणी अनुज कुमार सक्सेना (३३)यांनी तक्रार नोंदवली आहे. तक्रारीस अनुसरून कोलवा पोलिसांनी ‘बीएनएस’ ३०५ कलमान्वये अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंजू वंटमुरी पुढील तपास करीत आहेत.

काल रविवारी सकाळी चोरीची वरील घटना घडली. सक्सेना राहत असलेल्या फ्लॅटचा मुख्य दरवाजा तोडून चोरटे आत शिरले व लॅपटॉप, टॅब्लेट, मोबाईल व अन्य मौल्यवान वस्तू पळविल्या.

मागाहून चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर सक्सेना यांनी कोलवा पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान प्रथक व ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खेळ झाला अन् 'काळ' आला! फुटबॉल सामना संपताच अंदाधुंद गोळीबार; 11 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश

Goa News: गोव्यातील ‘कास’ शेती फुलणार! पिळगावचे शेतकरी 4 वर्षांनंतर सरसावले, वायंगणीसाठी तरव्याची लावणी

Zuarinagar: रस्ता दिसतो मात्र, गटारे अतिक्रमणात गायब! आमदार वाझ यांच्याकडून पाहणी; कारवाईसाठी पाठवणार अहवाल

Goa Opinion: शिरगाव चेंगराचेंगरी, हडफडे, चिंबल आंदोलन; प्रत्येक प्रकरणात सरकार बॅकफूटवर जातेय

Abhishek Sharma: 14 चेंडूत 50 धावा, तरी युवराज सिंग अभिषेक शर्मावर नाराज; म्हणाला, "अजून जमले नाही....."

SCROLL FOR NEXT