Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सरकारी यंत्रणेचा वापर; युरी आलेमाव यांचा आरोप

LokSabhaElection2024: सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा वापर केला. त्यांनी मतदान नियमांचे उल्लंघन केले.

गोमन्तक डिजिटल टीम

LokSabhaElection2024: सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा वापर केला. त्यांनी मतदान नियमांचे उल्लंघन केले. बळ व पैशांचा वापर केला. तरीही मतदार त्यांना योग्य उत्तर देणार असून निकालाच्या दिवशी ते स्पष्ट होणार आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले. दक्षिण गोव्यात (South Goa) निश्र्चितच इंडिया आघाडीचे काँग्रेस उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना यश मिळेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

कुंकळ्ळीतही मुख्यमंत्री, मंत्री, उद्योगपती आले, तरीही त्यांचा प्रभाव मतदारांवर पडलेला नाही व या मतदारसंघात इंडिया आघाडीच्या उमेदवाराला आघाडी मिळेल. कुंकळ्ळी मतदारसंघात सकाळी मतदान सुरू होण्यापूर्वी गिरदोळी, देमानी व चांदर येथील मतदार केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला. नंतर तो दुरुस्त करण्यात आला, अशी माहिती आलेमाव यांनी दिली.

आम्ही या निवडणुकीत आक्रमक प्रचार केला असून आम्ही नियोजनबद्ध व पद्धतशीरपणे प्रचार केला. त्याचा परिणाम मतमोजणीवेळी निश्र्चितच कळेल, असेही युरी आलेमाव यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुख-वैभवाचा 'राजयोग'! शुक्राच्या पॉवरफुल्ल गोचरमुळे 'या' 3 राशींना तगड फायदा, आता फक्त पैसा अन् पैसाच; गोल्डन पिरीयड सुरु

VIDEO: 10 रुपयांच्या अंड्याला लागली 'इतक्या' हजारांची बोली! इराणमधील युद्धग्रस्तांसाठी लडाखी जनतेचा मदतीचा हात; व्हिडिओ व्हायरल

Horoscope April 2026: 14 एप्रिलनंतर पालटणार 'या' राशीचं नशीब! गुरु आणि सूर्याच्या साथीमुळे कष्टाला मिळणार फळ; उत्पन्नाची दारे होणार खुली

US Israel Iran War: इस्रायल-अमेरिका हल्ल्यात इराणच्या गुप्तचर प्रमुखाचा मृत्यू; युद्धविरामाच्या प्रस्तावादरम्यान संघर्षाचा भडका

US Iran War: इराणच्या वाळवंटात स्वतःचीच हाय-टेक विमाने बॉम्बने उडवली, अमेरिकेनं असं का केलं? 'त्या' रात्रीचा थरार व्हायरल VIDEO

SCROLL FOR NEXT