Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Attacks On Police: '..उद्या हे गुन्हेगार पोलीस स्थानकांत घुसून हल्ला करतील', कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचा LOP युरींचा दावा

Yuri Alemao: कदंब महामंडळ हाताळण्यात वाहतूकमंत्री तसेच महामंडळाच्या अध्यक्षांना अपयश आले आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत नियमितता नाही, असेही आलेमाव म्हणाले.

Sameer Panditrao

पणजी: झारखंड येथील कामगारांनी जो पोलिसांवर हल्ला केला, त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून त्यांना पोलिसांचा देखील धाक राहिलेला नाही. उद्या अशा प्रकारे हे गुन्हेगार पोलीस स्थानकांत घुसून हल्ला करण्यास मागे पुढे पाहणार नसल्याने या प्रकारची सरकारने गंभीर दखल घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विरोधीपक्ष नेते युरी आलेमाव यांनी केले.

ते पणजीत छायापत्रकार संघटनेच्या कार्यक्रमासाठी आले असता माध्यमांशी बोलत होते. आलेमाव म्हणाले, कुंक्कळी पोलिस स्थानकांत स्टाफची कमतरता आहे, निदान गस्त तरी योग्य रितीने या भागात घालणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे कदंबच्या गाड्यांना गळती लागली आहे. कदंब महामंडळाची वाहतूक सेवा खालावली असून याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावरहोत आहे.

कदंब महामंडळ हाताळण्यात वाहतूकमंत्री तसेच महामंडळाच्या अध्यक्षांना अपयश आले आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत नियमितता नाही, असेही आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Water Metro in Goa: गोव्यात येतेय पहिलीवहिली 'वॉटर मेट्रो', मुरगाव ते तिसवाडी आता करा जलप्रवास; वाचा माहिती

कायदा हातात घ्याल, तर खबरदार - मुख्यमंत्री

Pakistan Khyber Airstrike: खुळ्यांची जत्रा! पाकिस्तानने आपल्याच लोकांवर टाकले 8 बॉम्ब; महिला, मुलांसह 30 जण ठार Video, Photo

Opinion: पोर्तुगीजांनी 'तिठे' उभारून बाजार भरवला, पण आज करोडो खर्चूनही विक्रेते रस्त्यावर का बसतात?

Opinion: गोव्यात 'भिवपाची गरज ना', असं गुंडांना वाटतंय; सामान्यांच्या मनात मात्र भीती!

SCROLL FOR NEXT