Crime News Dainik Gomantak
गोवा

Quepem Crime: तरुणीवर केला चाकू हल्ला, नंतर तीला इस्पितळात सोडले; केपे परिसरात खळबळ

Quepem Shirvai Crime: साक्षी नाईक असे त्या जखमी युवतीचे नाव असून ती तारीभाट बोरी येथील आहे. तर, संशयिताचे नाव अजय ऊर्फ अनंत कदम असे आहे.

Sameer Panditrao

मडगाव: कारमधून आलेल्या एका युवकाने दुचाकीवरून जाणाऱ्या एका युवतीला चाकूने भोसकण्याची खळबळजनक घटना आज सोमवारी दुपारी शिरवई-केपे येथे घडली.

या घटनेनंतर संशयिताने आपण स्वतःच त्या युवतीला आपल्या गाडीतून मडगाव येथे इस्पितळात दाखल केले. मात्र नंतर त्याने गाडी तेथेच टाकून पळ काढला. या नाट्यमय घडामोडीमुळे या घटनेचे गूढ वाढले आहे.

साक्षी नाईक असे त्या जखमी युवतीचे नाव असून ती तारीभाट बोरी येथील आहे. तर, संशयिताचे नाव अजय ऊर्फ अनंत कदम असे आहे. तो मडगावच्या तळसांझर-बोर्डा येथील आहे. साक्षी आपल्या मैत्रिणीसह दुचाकीने जात असताना अजयने हा प्राणघातक हल्ला केला. दरम्‍यान, या घटनेमुळे केपे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिस प्रशिक्षण अर्ध्यावर सोडले

पोलिससूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित अजय कदम याची २०२३ साली गोवा पोलिस दलात निवड झाली होती. मात्र दिल्ली येथील प्रशिक्षण अर्ध्यावर सोडून तो पळून आला होता. कालच्‍या घटनेत संशयिताने युवतीच्‍या पोटावर चाकूने सपासप वार केले. सध्या तिची प्रकृती गंभीर असून अधिक उपचारांसाठी तिला गोमेकॉत दाखल करण्‍यात आले आहे. केपे पोलिस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT