Goa Accident Case Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Case: थिवी येथे अपघातात राजस्थानचा युवक ठार

Goa Accident Case:

दैनिक गोमन्तक

Goa Accident Case:

थिवी येथे अचानक बुलेटवरील ताबा सुटल्याने ती घसरून समोरून येणाऱ्या दुचाकीवर आदळली. या अपघातात बुलेटचालक दलवीर सिंह (१९, राजस्थान) हा जागीच ठार झाला. बुलेटवरील दोघे आणि दुसऱ्या गाडीवरील एक मिळून तिघे जखमी झाले.

हा अपघात शनिवारी रात्री ८ च्या सुमारास घडला. दलवीर हा दोन मित्रांसमवेत करासवाडाहून अस्नोडाच्या दिशेने जात असता, ताबा सुटल्याने त्याची बुलेट घसरली आणि समोरून येणाऱ्या केटीएम दुचाकीला तिची जोरात धडक बसली.

यावेळी दलवीर रस्त्यावर फेकला गेला आणि तोंडावर आदळल्याने गंभीर जखमी होऊन तो जागीच ठार झाला. बुलेटवर मागे बसलेले बलराम सिंग आणि मनोज सिंग हे जखमी झाले. केटीएमवरील चालक शुभम हासुद्धा किरकोळ जखमी झाला. कोलवाळ पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

SCROLL FOR NEXT