सुकूर, पर्वरी येथे दोनच आठवड्यांपूर्वी घराच्या टेरेसवर गांजा या अमली पदार्थाची लागवड केल्याप्रकरणी ब्रिटीश नागरिकाला अटक करण्यात आली.
त्यानंतर बोरी, फोंडा येथे तळघरात गांजाचे पीक घेतल्याप्रकरणी 31 वर्षीय तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. पथकाने संशयिताकडून साडे आठ लाख किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली असून, युवराज बोरकर (३१, रा. बोरी, फोंडा) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कारवाईत त्याच्याकडून 150 ग्रॅम हायड्रोपोनिक वीड, एक किलोग्रॅम गांजा आणि 15 ग्रॅम एमडीएमए असा एकूण साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पथकाने कारवाईनंतर प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अटक तरुण आंतरराष्ट्रीय संकेतस्थळावरून अमली पदार्थाच्या बिया मागवत असे आणि त्याची तळघरात लागवड करत असे.
यासाठी त्याने काही अधुनिक पद्धतीच्या एलईडी लाईट्चा देखील वापर केल्याचे तपासातून समोर आले. पथकाने धडक कारवाईत तरुणाकडून अमली पदार्थाची रोपे आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.