Goa Drowning Death Dainik Gomantak
गोवा

Goa Drowning Death: मासेमारीचे जाळे सोडवताना तरुणाचा बुडून मृत्यू, शापोरा नदीत दुर्घटना; दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Mapusa Goa Drowning Death: रेवोडा येथील शापोरा नदीच्या पात्रात मासेमारीचे अडकलेले जाळे सोडवताना बुडालेल्या थॉमस फर्नांडिस (३५, रा. तरमास-तळर्ण, पेडणे) या युवकाचा मृतदेह अखेर शुक्रवारी सापडला.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: रेवोडा येथील शापोरा नदीच्या पात्रात मासेमारीचे अडकलेले जाळे सोडवताना बुडालेल्या थॉमस फर्नांडिस (३५, रा. तरमास-तळर्ण, पेडणे) या युवकाचा मृतदेह अखेर शुक्रवारी सापडला. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

ही दुर्दैवी घटना गुरुवारी (२ एप्रिल) दुपारी ३ च्या सुमारास घडली होती. पेडणे येथील ५ जणांचा गट रेवोडा येथे शापोरा नदीकाठी मासेमारीसाठी आला होता.

मासेमारी करत असताना नदीच्या पात्रात टाकलेले जाळे एका ठिकाणी अडकले. ते जाळे काढण्यासाठी थॉमस फर्नांडिस याने पाण्यात उडी घेतली, मात्र त्याला पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला.

थॉमस बराच वेळ बाहेर न आल्याने त्याच्या मित्रांनी आरडाओरड करून स्थानिकांची मदत मागितली. त्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. म्हापसा अग्निशमन दलाचे अधिकारी गणेश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी उशिरापर्यंत शोधमोहीम राबवण्यात आली, मात्र अंधारामुळे यश आले नाही.

शुक्रवारी, सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू असताना, घटनास्थळाजवळच नदीपात्रात मृतदेह तरंगताना आढळून आला. कोलवाळ पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT