Arrest Dainik Gomantak
गोवा

Margao: रेल्वे स्थानकावर 'तो' उतरला अन् पोलिसांना संशय आला; मुंबईतून अल्‍पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

Margao Railway Station: मुंबई पोलिसांशी संपर्क साधून संशयित आरोपीला मुंबई पाेलिसांच्‍या ताब्‍यात देण्‍यात आले.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: मुंबईहून एका अल्‍पवयीन मुलीला पळवू्न गोव्‍यात आणलेल्‍या एका युवकाला मडगाव रेल्‍वे पोलिसांनी काल रात्री ताब्‍यात घेऊन मुंबई पोलिसांच्‍या स्‍वाधीन केले.

या प्रक़रणी त्‍या युवकाच्‍या विरोधात महाराष्‍ट्रातील तुळींज पोलीस स्‍थानकावर अपहरणाचा गुन्‍हा नोंद केला आहे अशी माहिती कोकण रेल्‍वेचे पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांनी दिली.

बुधवारी (२९ ऑगस्ट) रात्री तो मुलगा आणि ती मुलगी मडगाव रेल्‍वे स्‍थानकावर उतरल्‍यावर संशयास्‍पदरित्‍या वावरताना त्‍यांना रेल्‍वे पोलिसांनी पाहिले.

रेल्‍वे पोलीस कॉन्‍स्‍टेबल सत्‍यवान गावकर आणि रागेश नाईक या दोघांनी महिला होमगार्ड माया वेळीप यांच्‍या सहाय्‍याने त्‍या दोघांना ताब्‍यात घेतले. त्‍यानंतर मुंबई पोलिसांशी संपर्क साधून संशयित आरोपीला मुंबई पाेलिसांच्‍या ताब्‍यात देण्‍यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aqua Mega Fish Festival: पणजीत रंगणार ‘ॲक्वा मेगा फिश फेस्टिव्हल’! देशभरातील विद्यार्थी, तज्ज्ञ येणार; ब्ल्यू इकॉनॉमीला चालना

Mopa Taxi Protest: मोपावरचे जाचक धोरण! टॅक्‍सीचालकांची मुख्‍यमंत्र्यांच्‍या निवासस्‍थानी धडक; CM सावंतांची शिष्टमंडळाशी चर्चा

Goa Live News: वास्कोतील कॅनरा बँकेत चोरीचा प्रयत्न; बाथरुमची खिडकी तोडून प्रवेश

Goa Third District: कहीं ख़ुशी कहीं गम! कुशावतीबाबत धारबांदोड्यात संमिश्र प्रतिक्रिया; राजकीय हेतू, कागदपत्रांच्या अडचणींवरून विरोध

Goa Opinion: 'बर्च क्लब'प्रकरणी कठोर कारवाई व्हावी, अन्यथा गोव्यातील पर्यटन मान टाकेल आणि राज्य भयाण आर्थिक संकटात सापडेल..

SCROLL FOR NEXT