Rakshabandhan | Organ Donation Dainik Gomantak
गोवा

'नात्यास नाव आपुल्या...', गोव्यात रक्षाबंधनला लहान भावाची बहिणीला किडनीची ओवाळणी

Goa Rakshabandhan Special Story: विशालसारखा विशाल मनाचा भाऊ लाभू दे असे बहिण सोनलने मनोगत व्यक्त केले

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: रोटरी क्लब ऑफ मडगाव मिडटाऊन, रोटरी क्लब ऑफ मडगाव, रोटरी क्लब ऑफ मडगाव सनरायजतर्फे जागतिक अवयव दान दिनी एक खास कार्यक्रम आयोजित करून बहिणीला मूत्रपिंड दान केलेल्या भावाचा व प्राप्तकर्ती बहिणीचाही सत्कार करण्यात आला. हा सोहळा रोटरी क्लबच्या सभागृहात झाला.

कर्करोगतज्ज्ञ डॉ. शेखर साळकर व त्याची पत्नी तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. मेधा साळकर यांच्या हस्ते भाऊ बहिणीचा सत्कार करण्यात आला.

देशात एका वर्षात अंदाजे १५ हजार किडनी ट्रान्सप्लांट होत असते. त्यातील ८० टक्के महिला मूत्रपिंड दान करणाऱ्या असतात तर केवळ २० टक्के महिला प्राप्तकर्त्या असतात, असे यावेळी सांगण्यात आले.

मूत्रपिंड दान केलेल्या भावाचे नाव विशाल तर प्राप्तकर्ती बहिणीचे नाव सोनल असे आहे.

सर्वांना विशालसारखा विशाल मनाचा भाऊ लाभू दे, असे सोनलने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. रोटरी क्लब मडगाव मिडटाऊनच्या अध्यक्ष डॉ. मारिया जुवाव साल्ढाना यांनी या सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविले. रोटरी क्लब ऑफ मडगावचे अध्यक्ष दिलीप नायक यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी रोटरी क्लब मडगाव सनरायजचे अध्यक्ष शीतल कुमार उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT