Yellow alert issued in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: यलो अलर्ट! गोव्यात दोन दिवस वादळी वारे, विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज

हवामान विभागाने खात्याने दोन या दिवसात घराबाहेर पडताना आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Pramod Yadav

भारतीय हवामान विभागाने (IMD) आज आणि उद्या (8 आणि 9 मे साठी) यलो अलर्ट जारी केला आहे. गोव्यात काही ठिकाणी वादळ, विजांचा कडकडाटासह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाने खात्याने दोन या दिवसात घराबाहेर पडताना आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

राज्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. दरम्यान, रविवारी आकाश ढगाळ होते मात्र, राज्यात कुठेही पावसाची नोंद झाली नाही. रविवारी राज्याच्या बहुतांश भागात कोरडे हवामान होते आणि काही ठिकाणी धुके पडले होते.

दरम्यान, येत्या 10 मे पासून राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमानात ‘मोठा बदल होणार नाही’. असे हवामान खात्याने म्हटले आहे.

हवामान खात्याने दिलेला यलो अलर्ट "जागरूक रहा" असा होतो. त्याचा अर्थ रेड अथवा ऑरेंज अलर्ट एवढा गंभीर नाही असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

गोव्याच्या शेजारील महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून विविध भागात पाऊस हजेरी लावत आहे. पुणे, मुंबईसह विदर्भ व मराठवाड्यात पावसाची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT