Yellow Alert In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता; गोव्यात ‘यलो अलर्ट’ जारी

Yellow Alert In Goa: पावसाची एकंदरीत परिस्थिती पाहता हवामान विभागाकडून आज 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

Manish Jadhav

राज्यात यंदा 4 जून रोजी मॉन्सूनचे दबक्या पावलांनी आगमन झाले. सुरुवातीच्या दिवसांत राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. आत्तापर्यंत 645.9 मि. मी. म्हणजेच 25.42 इंच पावसाची नोंद झाली आहे. मात्र तरीसुद्धा सरासरी 8 टक्के पाऊस कमीच पडला आहे.

दरम्यान, हवामान विभागाकडून गोव्यात (Goa) येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पावसाची एकंदरीत परिस्थिती पाहता हवामान विभागाकडून आज 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. हा यलो अलर्ट आज (मंगळवार, 25 जून) पासून पुढील चार दिवस असणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज (8 जून) उत्तर आणि दक्षिण गोव्यात (South Goa) 40-50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्यामुळे विभागातर्फे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, पुढील आठवडाभर राज्यातील कमाल तापमान 33- 35 अंश दरम्यानच राहणार आहे.

तसेच, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आल्याने समुद्रकिनारी न जाण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, पर्यटकांनाही खबरदारी बाळगण्यास सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT