Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa IMD: पुढील दोन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’; उष्णता वाढली

Goa IMD Yellow Alert: राज्यातील हवामानात सातत्याने बदल घडून येत आहेत. आता मॉन्सुनोत्तर कालावधी संपला असला तरी अजून राज्यात थंडीला सुरवात झालेली नाही.

दैनिक गोमन्तक

Goa IMD Yellow Alert: राज्यातील हवामानात सातत्याने बदल घडून येत आहेत. आता मॉन्सुनोत्तर कालावधी संपला असला तरी अजून राज्यात थंडीला सुरवात झालेली नाही.

राज्यात नोव्हेंबरपासून काही प्रमाणात थंडीला सुरवात होते; परंतु अजूनही काही प्रमाणात पावसाचे सावट आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याचे अंदाज फोल ठरत आहेत. मात्र, पुन्हा पुढील दोन दिवस म्हणजेच 9 नोव्हेंबरपर्यंत राज्यात मध्यम पावसाची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविली असून ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

दिवाळी काही दिवसांवर आली असताना अजून थंडी पडत नसल्याने वैज्ञानिकांनी यंदा थंडी लांबण्याचे संकेत दिले होते, ते खरे ठरण्याची शक्यता वाढली आहे.

तमिळनाडू, केरळ, कर्नाटकात मुसळधार

हवामान बदलामुळे तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या काही भागात काल रात्री मुसळधार पाऊस पडला. तमिळनाडूत काही ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले, तर घराघरांत पाणी शिरले.

आजपासून तीन दिवस या तिन्ही राज्यांत हवामान खात्यातर्फे पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तमिळनाडूतील शाळा शनिवारपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT