Goa News|Student  Dainik Gomantak
गोवा

Goa News: ‘झेवियर्स’ आंदोलनात बाह्यशक्तींचा हात असल्याचा व्यवस्थापनाचा दावा

सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शनिवारी अभाविपने केलेले आंदोलन हे विद्यार्थ्यांचे आंदोलन नसून यात बाहेरील शक्तीचा हात असल्याचा दावा कॉलेजने केला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शनिवारी अभाविपने केलेले आंदोलन हे विद्यार्थ्यांचे आंदोलन नसून यात बाहेरील शक्तीचा हात असल्याचा दावा कॉलेज व्यवस्थापनाने केला आहे.

‘अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हातात झेंडे घेऊन कॅम्पसमध्ये घोषणाबाजी केली. कॉलेज प्रशासन व संघटनेमध्ये विद्यार्थी मंडळ स्थापना विषयावरून संघर्ष वाढला.

तब्बल चार तास ‘अभाविप’चे कॅम्पसमध्ये धरणे, कॉलेज प्रशासनाला वेठीस धरले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून कॉलेज प्रशासनाने वर्ग थांबवून विद्यार्थ्यांना घरी पाठविले.

यावेळी अधिकारी, पोलिस फौजफाट्यामुळे कॉलेज परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. काही प्राध्यापकांकडून साहील महाजन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. या लोकांना कॅम्पसमधून हाकलण्याची प्राध्यापकांनी पोलिसांकडे मागणी केली.

अभाविपचे गोवा संघटनमंत्री गोविंद देशपांडे, उत्तर गोवा निमंत्रक सुदीप नाईक, साहील महाजन, अवधूत कोटकर, सर्वेश तळवडे, प्रभा नाईक, विनय राऊत, आकाश नाईक, शुभम मळीक, उत्तम पार्सेकर, दीप्ती कांबळी, अनिकेत तिंबले, संज्योत नारोजी आदींचा समावेश होता.

नोव्हेंबर 2022 साली मी कॉलेजचा सरचिटणीस म्हणून निवडून आलो. त्यावेळी २०२२-२३ सालासाठी कॉलेजमध्ये विद्यार्थी मंडळाची स्थापना करून त्याचा अधिकारग्रहण सोहळा करणे गरजेचे होते.

मात्र, कॉलेज प्रशासन व प्राचार्यांकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही किंवा तशी पावले उचलली गेली नाहीत. यासंदर्भात निवेदने देण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित प्रतिसाद देत नाहीत. - साहील महाजन, सरचिटणीस, सेंट झेवियर्स कॉलेज.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shocking Viral Video! चालत्या ट्रेनमध्येच प्रवाशानं केली लघवी; संतापलेल्या सहप्रवाशांनी घेरलं, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Junta House Demolition: पणजीतील 'जुन्ता हाउस'च्या पाडकामाला लवकरच सुरुवात, चोहोबाजूंनी पडद्याचे संरक्षण; इमारतीतील साहित्य हटवले

Bill Gates AI Warning: 'एआय'मुळे जाऊ शकतो एक अब्ज लोकांचा जीव! बिल गेट्स यांच्या भूमिकेने टेक जगतात खळबळ; नियम बनवण्याची सरकारकडे मागणी

Bicholim: रुंदीकरण केलेल्या रस्त्यावर बेकायदा पार्किंग, डिचोलीतील प्रकार; 'सेतू संगम' ते पोलिस क्वार्टर्सपर्यंतच्या वाहतुकीस धोका

अनिल सामंतांनी राजभाषा विषय अभ्यासावा... 

SCROLL FOR NEXT