ED Action Dainik Gomantak
गोवा

ED Action: 'ईडी'ची मोठी कारवाई! WTC ची गोव्यासह, दिल्ली, नोएडा येथील मालमत्ता जप्त; 2348 कोटींच्या संपत्तीवर टाच

Ashish Bhalla ED Action: ईडीने जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेत परवानाधारक व परवाना नसलेली सुमारे १५९ एकर जमीन व विक्री न झालेल्या रिअल इस्टेटचा त्यामध्ये समावेश आहे.

Sameer Panditrao

पणजी: गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) डब्ल्यूटीसी समूहाचे प्रमुख आशिष भल्ला यांच्या दिल्ली, गुरुग्राम, फरिदाबाद, नोएडा व गोव्यातील मिळून सुमारे २,३४८ कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. त्याच्या गोव्यातील मालमत्तेसंदर्भातची माहिती ईडीने उघड केली नसली तरी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

ईडीने जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेत परवानाधारक व परवाना नसलेली सुमारे १५९ एकर जमीन व विक्री न झालेल्या रिअल इस्टेटचा त्यामध्ये समावेश आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे. मात्र, माहिती उघड केलेली नसली यामध्ये अलिशान निवासस्थाने यांचा समावेश आहे.

या कंपनीने हजारो गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात रकमा घेऊन बेकायदेशीरपणे त्या रकमेचा वापर भूखंड खरेदी तसेच स्वतःच्या वापरासाठी केला आहे. या कंपनीने डब्ल्यूटीसी ब्रँड अंतर्गत भूखंड व व्यावसायिक जमिनींवर गुंतवणूक करून खात्रीशीर परतावा देण्याच्या सुव्यवस्थित योजनेद्वारे सुमारे १२ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांना फसवले आहे.

हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब, चंदीगडसह अनेक राज्यांमधील गुंतवणूकदारांकडून २,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्यात आली आहे. भल्लाच्या कुटुंबीयांच्या सिंगापूरातील संस्थांना रक्कम हस्तांतरित झाली, असे ईडीने म्हटले आहे.

जप्त मालमत्ता गुन्ह्यांतील रकमेच्या!

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी शोध मोहीम राबवली होती, त्या दरम्यान भल्ला फरार झाला आणि प्रमुख साक्षीदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ६ मार्च २०२५ रोजी त्याला अटक करण्यात आली, जेणेकरून तपासात अडथळा येऊ नये आणि पुराव्यांशी छेडछाड होऊ नये. जप्त केलेल्या मालमत्ता थेट गुन्ह्यांतून मिळालेल्या रकमेच्या असल्याचे तपासात प्रथमदर्शनी आढळून आल्याने ही कारवाई करून स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मोपाच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाहन पार्किंगचे दर वाढले!

Purple Fest: आमीरसोबत 'सितारे जमीन पर'ची टीम येणार गोव्यात? कलाकारांना केले आवाहन; मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती

'गुंड निर्धास्‍त आणि सामान्‍य जनता घाबरली आहे'! सरदेसाईंचे टीकास्त्र; काणकोणकर हल्‍लाप्रकरणी सूत्रधाराचे नाव जाहीर करण्याची मागणी

Chimbel: 'सरकारने हट्टाला पेटू नये, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये', चिंबलवासीय लढ्याच्या तयारीत; युनिटी मॉलला कडाडून विरोध

Thimmappiah Tournament: ..पुन्हा तेंडुलकरने सावरले! गोव्याच्या फलंदाजांची घसरगुंडी; द्विशतकी आघाडीमुळे स्थिती भक्कम

SCROLL FOR NEXT