Village Names In Goa
Village Names In Goa Dainik Gomantak
गोवा

Village Names In Goa: मडगावचे मार्गों! जुन्या नामफलकांतील गावांची नावे ‘नादुरुस्तच’, पर्यटकांचा गोंधळ

गोमन्तक डिजिटल टीम

Village Names In Goa

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावर काही ठिकाणी गावांचे नामफलक उभारताना नावातील चुका दुरुस्त केल्या आहेत. परंतु जुन्या नामफलकावरील चुका अद्याप तशाच असल्याने पर्यटकांचा गोंधळ उडत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी वर्गाने या गोष्टींकडे लक्ष देऊन चुका असलेले जुने नामफलक बदलण्याची गरज आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गोव्यात ठिकठिकाणी गावांचे नामफलक उभारताना त्याच चुका केल्या आहेत, त्यामुळे गावांचे मूळ नाव बदलण्याची किमया प्राधिकरणाने केली आहे. प्राधिकरणाने गावच्या नावांतील अपभ्रंशामुळे काही ठिकाणी नावांमध्ये विनोद निर्मिती झाली आहे.

परंतु आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन नामफलक उभारताना काळजी घेतली आहे. त्यांनी गाव, स्थळांची नावे योग्यरित्या लिहिली आहेत. नवीन फलकावर चुका टाळल्या आहेत.

दाबोळी झुआरीनगर मार्गावर नवीन नामफलक उभारताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मडगाव, फोंडा, पणजी अशी नावे हिंदी व इंग्लिशमध्ये योग्यरित्या लिहिली आहेत. त्यांनी नावे लिहताना शुद्धलेखनातील चुका टाळल्या आहेत. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

विचित्र नावांमुळे विनोद

येथील दाबोळी-बोगमाळो चौकात उभारण्यात आलेल्या नामफलक कमानीवरील नावे अद्याप विचित्र पद्धतीने लिहलेली दिसून येतात. मडगावचे मार्गों, बोगमाळोचे बोग्मालो, वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेटचे वर्ना इंडस्ट्रियल इस्टेट अशी नावे वाचून स्थानिक कपाळाला हात लावतात. याप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT