Goa Accident Case: पाच वर्षापूर्वीचे अपघाती मृत्यू प्रकरण, संशयित ट्रक चालकाची निर्दोष मुक्तता

Goa Accident Case: न्यायालयात सादर केलेल्या आरेपपत्रानुसार अपघाताची ही घटना १९ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री नऊच्या सुमाराला वेर्णा पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडली होती.
Accident Case Update
Accident Case UpdateDainik Gomantak

Goa Accident Case

अपघाती मृत्यूप्रकरणी न्यायालयाने डोंगरवाडो-फातोर्डा येथील व्हिक्टर आरावजो (५३) या संशयिताला संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला.न्यायालयात सादर केलेल्या आरेपपत्रानुसार अपघाताची ही घटना १९ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री नऊच्या सुमाराला वेर्णा पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडली होती.

संशयित चालवत असलेल्या टिप्पर ट्रकची एका अज्ञात पादचाऱ्याला धडक बसली होती. गंभीररित्या जखमी झालेला तो अज्ञात पादचारी मृत झाला होता. वेर्णा पोलिसांनी संशयितविरुद्ध (७९/२०१९) गुन्हा नोंद केला होता.

७ ऑक्टोबर २०१९ रोजी वेर्णा पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केल्यानंतर ५ जानेवारी २०२२ रोजी संशयिताला त्याच्यावर असलेला आरोप न्यायालयात सांगितला तेव्हा संशयिताने आपल्यावरील हा आरोप नाकारला.

खटल्याच्या पुराव्यासंबंधीच्या कामकाजाला प्रारंभ झाला. मात्र सरकारपक्षाला हा खटला सिद्ध करण्यास अपयश आल्यामुळे मडगावच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने संशयिताला संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com