PT Usha In Goa: भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला जात आहे. WFI चे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया यांच्यासह महिला कुस्तीपटू दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत.
दरम्यान, भारताची माजी अव्वल धावपटू ‘पायोली एक्सप्रेस’ आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अध्यक्ष पी. टी. उषा यांनी गोव्यात महत्वाची माहिती दिली आहे.
काय म्हणाल्या पी.टी उषा?
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अध्यक्ष पी. टी. उषा सध्या गोव्यात आहेत. उषा यांना यावेळी दिल्लीत सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत विचारण्यात आले.
'केंद्र सरकार याबाबत काहीतरी करत आहे, आपण केंद्राची निर्णयाची वाट बघुया. केंद्राने यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत, उद्या त्याबाबत बैठक होणार आहे. आपण काय करू शकतो ते पाहू. खेळाडुंनी आम्हाला संपर्क केला नाही, त्यांनी थेट सरकारला संपर्क केला.' असे पी. टी. उषा म्हणाल्या.
दरम्यान, सात महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कॅनॉट पॅलेस पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.
'आम्ही कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या तक्रारींची चौकशी करत आहोत आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे एफआयआर नोंदवला जाईल. हरियाणा आणि बाहेरील कुस्तीपटूंकडून एकूण सात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.' असे दिल्ली पोलिसांच्या हावाल्याने एक वृत्तसंस्थेने बातमी दिली आहे.
ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात मागील चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. यामध्ये महिला कुस्तीपटू यांच्यासह अनेक खेळाडुंचा समावेश आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.