WORLD CLEAN UP DAY Celebrated By village panchayat cavelosim Dainik Gomantak
गोवा

World Cleanup Day 2023: पर्यटक यायला पाहिजेत तर किनारेही साफ ठेवण्‍याची गरज : डिक्सन वाझ

कार्यकर्त्यांच्‍या साहाय्‍याने केळशी किनाऱ्याची सफाई

दैनिक गोमन्तक

World Cleanup Day 2023: किनारपट्टी भागात पर्यटन हाच स्‍थानिकांच्‍या रोजगाराचा प्रमुख स्राेत असून किनाऱ्यांना भेट देण्‍यासाठीच हे पर्यटक येत असतात.

अशावेळी किनारे अस्‍वच्‍छ राहिल्‍यास पर्यटक त्‍यांच्‍याकडे पाठ फिरवतील आणि त्‍याचा वाईट परिणाम स्‍थानिक व्‍यावसायिकांना भोगावा लागेल, असा इशारा देतानाच त्‍यामुळेच किनारे साफ ठेवण्‍यासाठी स्‍थानिकांनी स्‍वत: सक्रिय व्‍हायला पाहिजे, असे आवाहन केळशीचे सरपंच डिक्‍सन वाझ यांनी केले.

‘वसुंधरा दिना’चा कार्यक्रम म्‍हणून केळशी पंचायत, केळशी जैवविविधता व्‍यवस्‍थापन समिती यांनी गोवा राज्‍य जैवविविधता मंडळ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने केळशी किनारा सफाईचा कार्यक्रम हाती घेतला.

एकूण चार ठिकाणी सुमारे ३०० कार्यकर्त्यांच्‍या मदतीने ही मोहीम राबवून सुमारे एक टन प्‍लास्टिक कचरा एकत्र केला. या सफाई मोहिमेत स्‍वत: सरपंच वाझ यांनी भाग घेतला होता.

‘प्‍लास्टिक’वर चर्चासत्र

यावेळी प्‍लास्टिक विरोधी माेहिमेचा भाग म्‍हणून ‘वसुंधरा आणि प्‍लास्टिक’ याविषयावर चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्‍हिएगस तसेच गोवा राज्‍य जैवविविधता मंडळाचे सदस्‍य सचिव डॉ. प्रदीप सरमुकादम यांनी भाग घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Youth Protes: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

SCROLL FOR NEXT