Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे

Yuri Alemao : फोंड्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

दैनिक गोमन्तक

Yuri Alemao: काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विचलित न होता, नेटाने काम करावे, दक्षिण गोव्याचा गड राखावा, असे आव्हान विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी फोंडा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. या बैठकीपासून काँग्रेसने दक्षिण गोवा लोकसभेच्या जागेकरता प्रचाराचे रणशिंग फुंकले असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यासपीठावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, सरचिटणीस विरायतो फेर्नांडिस, सावियो डिसिल्वा, काँग्रेस युवा विभागाचे अध्यक्ष ज्योएल ॲंड्रेड, सोशल मिडिया अध्यक्ष दिव्यकुमार खंडहर, फोंड्याचे काँग्रेस गटाध्यक्ष विलियम आगियार, माजी सरपंच जॉन परेरा, अरुण गुडेकर, राजेश वेरेकर व महिला अध्यक्ष शेर्ली डायस उपस्थित होते.

आलेमाव पुढे म्हणाले, भाजपने जरी नुकत्याच पार पाडलेल्या निवडणुकीत तीन राज्यात विजय मिळवला असला तरी भाजप व काँग्रेसमध्ये फक्त दोन टक्क्यांचा फरक आहे. हा फरक लोकसभा निवडणुकीत नाहीसा होईल आणि काँग्रेस बहुमताने निवडून येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

सावियो डिसिल्वा, शेर्ली डायस आणि इतरांनी आपले विचार मांडले. मान्यवरांचा हस्ते काही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या लक्षणीय कामिगरीबद्दल सत्कार करण्यात आला. स्वागत गटाध्यक्ष विलियम आगियार यांनी केले.

फोंड्यातून तयारी!

राजेश वेरेकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीची तयारी फोंड्यापासून सुरू होणे, हे फोंडेकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या विश्‍वासाला उतरावे, असे आवाहन केले. दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोंड्यात फोडला असून हे फोंड्याच्या कार्यकर्त्यांकरिता अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले. येणाऱ्या दिवसात कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन रणनीती स्पष्ट केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT