Margao Municipal Council  Dainik Gomantak
गोवा

मडगाव नगरपालिकेतील मजुरांचा कामावर जाण्यास नकार

न्याय कधी मिळणार; चार महिन्यांपासून पगारवाढ नाही

दैनिक गोमन्तक

सासष्टी: रविवारी देशभर कामगार दीन उत्साहाने साजरा करण्यात आला. मात्र राज्यातील कामगारांचे प्रश्न सोडवण्यात प्रशासनाला अजूनही यश आले नाही. मडगाव नगरपालिकेतील रोजंदारीवर काम करणाऱ्या अंदाजे 150 मजुरांना गेल्या चार महिन्यांपासून पगारवाढ करण्यात आलेली नाही. या मजुरांना रविवारी 1 मे पासून नवीन करार करुन आदेश देणे गरजेचे होते कारण त्यांचा करार 30 एप्रिल 2022 पर्यंत होता. त्यामुळे या मजुरांनी कामावर जाण्यास नकार दिला. (Workers of Margao Municipality refuse to go to work)

नगरपालिका सुपरव्हाईजराच्या म्हणण्यानुसार, 15 दिवसांपुर्वी या मजुरांच्या कामाचा नवीन आदेश काढण्यासाठी नगरपालिकेतील उच्चपदस्त अधिकाऱ्यांना कळवले होते. मात्र नेमके कुठे अडले ते आपल्याला माहित नाही. आपण नगराध्यक्षांशी बोलणी केली असून आपण सोमवारी या बद्दल निर्णय घेऊ, असे त्यांनी कळविल्याचे पर्यवेक्षकाने सांगितले. त्यामुळे आज कचरा गोळा करण्यासाठी किंवा इतर साफ सफाई करण्यासाठी जे कायमस्वरुपी कामगार आहेत त्यांनाच आपण पाठवले असे त्याने सांगितले.

रोजंदारीवरील मजुरांना जानेवारी 2022 पासून पगार वाढ झाली असून दिवसाकाठी 500 रुपयांवरुन 700 रुपये केले आहेत. मात्र गत चार महिन्यांपासून त्यांना 500 रुपयेच दिल्याचे मजुरांनी सांगितले. आम्हाला वाढीव पैसे कधी मिळणार, असा प्रश्न एका कामगाराने उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT