Tragic Incident In Taleigao Dainik Gomantak
गोवा

Taleigao Accident: विजेचा शॉक लागून 24 वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; ताळगावातील हृदयद्रावक घटना

Tragic Incident In Taleigao: ताळगावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंखा सुरु करण्याच्या प्रयत्नात विजेचा धक्का लागून एका कामगाराचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

Worker Electrocuted While Turning On Fan at Construction Site in Taleigao

पणजी: ताळगावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंखा सुरु करण्याच्या प्रयत्नात विजेचा शॉक लागून एका कामगाराचा मृत्यू झाला. राजीव साहनी (वय, वर्ष 24) असे कामगाराचे नाव आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पंखा सुरु करण्याच्या प्रयत्नात विजेचा शॉक लागून 24 वर्षीय राजीवचा मृत्यू झाला. ताळगाव (Taleigao) येथे बांधकाम सुरु असलेल्या एका ठिकाणी ही घटना घडली. राजीव हा चौथ्या मजल्यावर आराम करत होता. त्यावेळी तिथे असलेला पंखा सुरु करण्याचा प्रयत्न त्याने केला. या प्रयत्नात त्याला विजेचा शॉक बसला आणि तो मरण पावला. उपचारासाठी त्याला गोवा मेडिकल कॉलेज येथे नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पालये-पेडणे येथे 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी, पालये-पेडणे येथे एका 18 वर्षीय मुलाचा हॉलिबॉल खेळताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. पीडित तरुण आपल्या मित्रांसोबत व्हॉलिबॉल खेळत होता. याचदरम्यान, लगतच्या विजेच्या खांबाला त्याचा स्पर्श झाला. स्पर्श झाल्यावर लगेच तो धक्का लागून जमिनीवर कोसळला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT