Goa News Gomantak Digital Team
गोवा

Goa News : काकोड्यात ‘चेंबर’चे काम निकृष्ट ; पहिल्याच पावसात पितळ उघडे मलनिस्सारण’मुळे रस्ताही खचला

कुडचडे बाजारात व अंतर्गत भागात काही ठिकणी पाणी तुंबल्याने व मलनिस्सारण वाहिन्यांच्या चेंबर्समुळे कुडचडेत गंभीर स्थिती

गोमन्तक डिजिटल टीम

कुडचडे पालिकाक्षेत्रात मलनिस्सारण प्रकल्पासाठी जे चेंबर्स बांधले आहेत, त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे पहिल्याच पावसाने दाखवून दिले.शनिवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे काकोडा भागात रस्त्यांच्या मधोमध बांधलेल्या चेंबर्सना भगदाडे पडल्याने काहींच्या दुकानांत घाण पाणी शिरले. त्यामुळे मलनिस्सारण कामाच्या दर्जाविषयी लोकांनी संशय व्यक्त केला आहे.

राज्यात मान्सून सक्रीय होण्यास यावर्षी काही प्रमाणात उशीर झाला असला तरी सध्या काही प्रमाणात पडत असलेल्या पावसामुळे कुडचडे भागात मलनिस्सारण वहिनीच्या चेंबर्सच्या निकृष्ट बांधकामांमुळे रस्त्यांवर भगदाड पडून रस्ते खचू लागले आहेत.शनिवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कुडचडे बाजारात व अंतर्गत भागात काही ठिकणी पाणी तुंबल्याने व मलनिस्सारण वाहिन्यांच्या चेंबर्समुळे कुडचडेत गंभीर स्थिती उद्‍भवेल असे लोकांचे म्हणणे आहे.

कंत्राटदाराचा विश्‍वामित्री पवित्रा

मलनिस्सारण वाहिन्यांसाठी ज्या रस्त्यावर चेंबर बांधले होते, तो रस्ता खचू लागला आहे. सरकारी इस्पितळ ते कॉन्व्हेंट आणि महादेव मंदिरापर्यंत पाच ठिकाणी रस्त्यावर भगदाड पडल्याचे रविवारी सकाळी उघडकीला आले.स्थानिकांनी मलनिस्सारण वाहिनीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आपण ते काम केलेच नाही, असे सांगून त्याने हात वर केले.त्यामुळे स्थानिक नगरसेवक लोकांच्या निशाण्यावर आले आहेत.

‘बंद’चा आदेश तरी खोदकाम सुरूच !

मॉन्सून तोंडावर असताना मलनिस्सारण आणि भूमीगत वीज वाहिन्यांची कामे कुडचडेत सुरूच आहेत.जे रस्ते खोदले होते त्यांची डागडुजी न करता रस्ते खोदण्याचे काम सुरूच ठेवल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे.पंधरा मेनंतर राज्यातील खोदकाम ‘बंद’ चे आदेश जारी होतात.तरीही कुडचडेत खोदकाम सुरू आहे. जाब विचारल्यास वरून आदेश आल्याचे सांगितले जाते.रेती ऐवजी साळ नदीचा गाळ व खडीची भुकटी वापरून चेंबर्सची उभारल्यावर लोकांनी आक्षेप घेतला.पण नगरसेवकांनी त्यांकडे डोळेझाक केली.

कंत्राटदाराने काम व्यवस्थित न केल्याने रस्त्यावर भगदाडे पडली आहेत. पालिकेने कामगार दिले नाहीत म्हणून ७० हजार रुपये खर्च करून आपण २१ धोकादायक झाडे तोडली आहेत. सकाळपासून रस्त्यावरील चर बुजवण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिथे घातलेले दगड रस्ता खचू लागल्याने आत जात आहेत. या निकृष्ट कामांमुळे लोकांच्या रोषाला तोंड देण्याची आमच्यावर आली आहे.

आनंद प्रभुदेसाई, माजी नगरसेवक

पालिका क्षेत्रातील मॉन्सूनपूर्व कामे,दहा जूनपर्यंत करणार असल्याचे कुडचडे भाजप युवा मोर्चातर्फे पत्रकार परिषदेत सांगितले होते. पण आता १८ तारीख उलटून गेली तरी ही कामे झालेली नाहीत. कुडचडेतील स्टेशन रोडवरील स्थिती ‘जैसे थे’ असून शनिवारच्या पावसामुळे लोकांच्या दुकानात पाणी गेल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे.

बाळकृष्ण होडरकर, नगरसेवक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT