Shri Devi Bhumika Temple, Ashwem, Mandrem Pernem Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मंदिराबाहेर उपोषण करणाऱ्या महिलेला बेदम मारहाण, विनयभंगही केल्याचा आरोप; सहा जणांविरोधात गुन्हा

Goa Crime News: जमावाने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Pramod Yadav

Goa Crime News

पेडणे: मांद्रे, पेडणे येथील मंदिराबाहेर उपोषण करणाऱ्या महिलेला बेदम मारहाण करुन तिचा विनयभंग केल्याचा आरोपात सहा जणांना अटक करण्यात आलीय. आश्वे, मांद्रे येथील श्री देवी भूमिका मंदिरात सोमवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली. मांद्रे पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

प्रविण सावंत, राजेश सावंत, जयराम सावंत व त्यांची पत्नी, लाडू सांवत व त्यांची पत्नी (सर्वजण रा. आश्वे, मांद्रे पेडणे) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 352, 115(2), 75, 351 (3) r/w 3(5) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आश्वे येथील श्री देवी भूमिका मंदिराबाहेर उपोषण करत होती. दरम्यान, रात्री आठच्या सुमारास महिला व पुरुषांच्या जमावाने महिलेला बेदम मारहाण केली. तसेच अश्लील शिवीगाळ करुन तिचा विनयभंग देखील केला, असे महिलेने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

जमावाने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT