महिला कॉंग्रेसला परत सत्तेत आणणार - डॉ. सिमा फर्नांडिस Dainik Gomantak
गोवा

Goa Politics : महिला कॉंग्रेसला पुन्हा सत्तेत आणणार

कॉंग्रेस (Congress ) सरकाराने महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले.

दैनिक गोमन्तक

मडगाव : कॉंग्रेस पक्षाने (Congress Party) महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना चालीस लावल्या. कॉंग्रेसच्या सरकारानी महिलांना (Women) स्वावलंबी बनविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. येत्या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाला सत्तेत आणण्यासाठी गोव्यातील महिला महत्वाची भूमीका बजावणार असे प्रतिपादन अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या गोवा प्रभारी डॉ. सिमा फर्नांडिस यांनी केले.

गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीतर्फे दहा महिल गट समित्यांना नियुक्ती पत्रे देण्याच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी गोवा प्रदेश महिला कॉंग्रेस अध्यक्ष बिना नाईक हजर होत्या. दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात आयोजित कार्यक्रमात डॉरिस टेक्सेरा, मडगाव, उर्सिला कॉस्ता, काणकोण, ॲल्ड्रीना, केपे, सोनिया फर्नांडिस, कुंकळ्ळी व रजनी रायकर, नावेली यांना डॉ. सिमा फर्नांडिस यांनी नियूक्ती पत्रे दिली.

उत्तर गोवा जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात महिला कॉंग्रेस निरीक्षकांनी रोशन देसाई, वाळपय, पार्वती नागवेकर, शिवोली, सोनल मालवणकर, साळीगांव, पेलिजा पिरीस, सांत आंद्रे व मारिया क्रिस्तीना वरेला, कुंभारजूवा यांना डॉ. सिमा फर्नांडिस यांनी नियुक्तीपत्रे दिली.

गोवा प्रदेश महिला अध्यक्ष बिना नाईक यांनी यावेळी बोलतांना सर्व महिला कॉंग्रेस सदस्यांनी कॉंग्रेस पक्षाला विजयी करण्यासाठी झटावे असे आवाहन केले. महिला कॉंग्रेस कोविड संकटात तसेच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या महिलांसाठी मदत करण्याची योजना राबविणार असल्याचे बिना नाईक यांनी सांगितले. संपुर्ण चाळीस मतदारसंघात महिला कॉंग्रेसची बांधणी करून नियुक्तीपत्रे देण्यात येणार असल्याची माहिती बिना नाईक यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT