Cancer patients statistics goa Dainik Gomantak
गोवा

Cancer Patients In Goa: सावधान! गोव्यात वाढते आहे कॅन्सरचे प्रमाण; आरोग्यमंत्री राणेंनी केली आकडेवारी जाहीर

Cancer Patients Statistics Goa : गेल्‍या सात वर्षांच्‍या काळात राज्‍यातील ५७.६० टक्‍के महिला आणि ४२.४० टक्‍के पुरुषांमध्‍ये विविध प्रकारच्‍या कॅन्‍सरचे निदान झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Cancer Cases in Goa : गेल्‍या सात वर्षांच्‍या काळात राज्‍यातील ५७.६० टक्‍के महिला आणि ४२.४० टक्‍के पुरुषांमध्‍ये विविध प्रकारच्‍या कॅन्‍सरचे निदान झाले. प्रत्‍येक वर्षी कॅन्‍सर रुग्‍णांमध्‍ये वाढ होत असून, सर्वाधिक रुग्‍ण स्‍तन कॅन्‍सरचे असल्‍याचे आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी विधानसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून समोर आले आहे.

२०१९ ते २०२५ या सात वर्षांच्‍या काळात राज्‍यात सर्वाधिक (२,२००) रुग्‍ण स्‍तनाच्‍या कॅन्‍सरचे आढळले. त्‍यांची टक्‍केवारी एकूण रुग्‍णांच्‍या २५.४ टक्‍के इतकी आहे. तर, २०२९ पासून २०२५ पर्यंत प्रत्‍येक वर्षी सर्वच प्रकारच्‍या कॅन्‍सर रुग्‍णांत वाढ झाल्‍याचे आकडेवारीतून दिसते. वयोगटावर नजर टाकल्‍यास ५१ ते ७० वर्षे या वयोगटातील सर्वाधिक ३,९६२ जणांना कॅन्‍सरचे निदान झालेले आहे.

दरम्यान, २०१९ पासून २०२५ पर्यंतच्या कालावधीत दरवर्षी विविध प्रकारच्या कर्करोगांच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचेही आकडेवारीतून दिसून येते. बदलती जीवनशैली, ताणतणाव, अयोग्य आहार पद्धती आणि पर्यावरणीय घटक यामुळे कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

वयोगटानुसार पाहिल्यास ५१ ते ७० वर्षे या गटातील नागरिकांमध्ये कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळले आहे. या वयोगटातील तब्बल ३,९६२ जणांना कर्करोगाचे निदान झाले आहे. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून जागरूक राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT