Bhajan Competition  Dainik Gomantak
गोवा

पं. मनोहरबुवा शिरगावकर स्मृती विभागीय महिला भजन स्पर्धेला प्रारंभ, कला अकादमी गोवा तर्फे आयोजन

केंद्र क्र. 2 वरील भजन स्पर्धा शंखवाळ येथील श्री शांतादुर्गा लक्ष्मी नृसिंह सांखळ्यो संस्थानच्या सभागृहात उत्साहात स्पर्धा संपन्न

गोमन्तक डिजिटल टीम

कला अकादमी गोवा आयोजित पं. मनोहरबुवा शिरगावकर स्मृती विभागीय भजन स्पर्धेच्या केंद्र क्र. 2 वरील भजन स्पर्धा शंखवाळ येथील श्री शांतादुर्गा लक्ष्मी नृसिंह सांखळ्यो संस्थानच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाली. भजन स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सदर संस्थानतर्फे स्वीकारली होती. दोन सत्रात ही स्पर्धा घेण्यात आली.

शंखवाळ येथील श्री शांतादुर्गा लक्ष्मी नृसिंह सांखळ्यो संस्थान येथे झालेल्या पहिल्या सत्रात सकाळी केंद्र क्र. 2 व सत्र क्र. 1 मध्ये श्री रुमडेश्वर दत्तात्रय महिला भजन मंडळ (रुमडावाडा वास्को), श्री रामनाथ दामोदर भजन पथक (चिखली), श्री लक्ष्मी नारायण भजन मंडळ (हेडलँड सडा), श्री राष्ट्रोळी जय संतोषी माता महिला भजन मंडळ (नवेवाडे- वास्को), दामोदर महिला भजन मंडळ (कासावली-मुर्डी), शारदा संगीत विद्यालय (हेडलँड सडा-वास्को), हनुमान महिला भजन मंडळ (नॉन मॉन वास्को) ही पथके सहभागी झाली होती.

Bhajan Competition

दुपारी झालेल्या दुसऱ्या सत्रात श्री ब्राह्मणेश्वर महिला भजन मंडळ (वास्को), श्री शिव समर्थ सांस्कृतिक मंडळ (वास्को), गजानन बोगदेश्वर महिला भजन मंडळ (बोगदा), श्री राम भजन मंडळ (मेस्तवाडा- वास्को), स्वरब्रह्म संगीत सांस्कृतिक महिला भजन मंडळ (एलमाँत वास्को), विठ्ठल रखुमाई श्रीस्थळ(काणकोण), साईकृपा मंडळ (वास्को), ॐ राष्ट्रोळी सेल्फ हेल्प ग्रुप (वास्को), श्री देवस्थान पागी समाज (खोल काणकोण), श्री पार्वती महिला मंडळ श्रीकृष्ण भजन मंडळ (काणकोण) व गोमंत भारती महिला मंडळ (करमळी) ही पथके सहभागी झाली होती.

दरम्यान स्पर्धेची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर संस्थानचे अध्यक्ष संदीप सदाशिव नाईक, सचिव अशोक तुळशीदास नाईक, खजिनदार राजू रघु नाईक, अखत्त्यार रोहन रत्नाकर नाईक, तसेच परीक्षक अरुण गावकर, प्रसाद गावस, उमाकांत वाडकर व कला अकादमी गोवाचे कार्यक्रम विकास अधिकारी संजीव झर्मेकर उपस्थित होते.

सुरुवातीला कार्यक्रम विकास अधिकारी झर्मेकर यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले तसेच भजन स्पर्धेच्या आयोजनाचा मुख्य हेतू स्पष्ट केला. नंतर विभागीय पातळीवरील महिला भजनी स्पर्धेला प्रारंभ झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! ODI World Cup 2027 मध्ये एकाच ग्रुपमध्ये दोन्ही संघ; टीम इंडियाचं संपूर्ण Schedule एका क्लिकवर

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

SCROLL FOR NEXT