मडगावात मेणबत्ती मिरवणूक esakal
गोवा

Goa Congress : भाजपच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत!

कॉंग्रेस : महिला कुस्तीगिरांना न्याय मिळण्यासाठी मडगावात मेणबत्ती मिरवणूक

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव : भाजपच्या राज्यांमध्ये महिला सुरक्षित नाहीत, हे सध्या महिला कुस्तीगिरांना जी वागणूक मिळते, त्यावरून सिद्ध होते. ज्या महिलांनी देशाचे नाव उज्ज्वल केले, त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटो काढत होते, त्याच मोदींना आता त्यांच्या कार्यालयापासून ४० मिनिटांच्या अंतरावर जंतर-मंतर मैदानावर जाऊन त्यांची कैफियत ऐकून घेण्यास वेळ नाही, अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केली.

सध्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या मल्लांना न्याय मिळावा, यासाठी आज विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी मडगाव लोहिया मैदानासमोर मेणबत्ती मोर्चा काढला. यात ‘आप’चे आमदार वेंझी व्हिएगस, क्रुझ सिल्वा, महिला नेत्या सिसिल रॉड्रिग्स, प्रतिमा कुतिन्हो, वाल्मिकी नाईक, समाज कार्यकर्ते शंकर पोळजी, रामा काणकोणकर तसेच मान्यवर उपस्थित होते.

प्रतिमा कुतिन्हो यांनी, महिला मल्लांना लवकर न्याय द्यावा आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली.

स्मृती इराणींवर शरसंधान

यावेळी सिसिल रॉड्रिग्स यांनी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्यावर हल्लाबोल करताना, त्यांना गोव्यात येऊन खासगी कार्यक्रमाचे उदघाटन करण्यास वेळ आहे; पण जंतर-मंतरवर जाऊन त्या मल्लांचे म्हणणे ऐकून घेण्यास वेळ नाही ही शोकांतिका आहे, असे मत व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT