Candolim Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: मालमत्तेच्या वादातून महिलेचा भोसकून खून

Goa Crime News: नेसाय-पाद्रीभाट येथे मालमत्तेच्या वादातून फ्लोरेंटिना फर्नांडिस (53) या महिलेचा चाकू भोसकून खून करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: नेसाय-पाद्रीभाट येथे मालमत्तेच्या वादातून फ्लोरेंटिना फर्नांडिस (५३) या महिलेचा चाकू भोसकून खून करण्यात आला. याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी संशयित मारिओ ओलिव्‍हेरा (३४) याला अटक केली आहे. हे भांडण सोडविण्‍यास गेलेला त्‍यांचा शेजारी जुबेन ओलिव्‍हेरा याच्‍या हातावर चाकूचा वार बसल्‍याने तोही जखमी झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लोरेंटिना फर्नांडिस व मारिओ ओलिव्‍हेरा हे दोघेही एकमेकांचे शेजारी असून त्‍यांच्‍यात मालमत्तेवरून जुना वाद आहे. काल रविवारी रात्री पावणेअकराच्या त्‍यांच्‍यात पुन्‍हा वाद सुरू झाला. याच वादातून संशयित मारिओ फर्नांडिस याने चाकू काढून फ्लोरेंटिना फर्नांडिस

हिच्यावर वार केले. तिला वाचवण्यासाठी गेलेला तिचा शेजारी जुबेन याच्‍याही हाताला चाकू लागला. घटनेनंतर मारिओने घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या फ्लोरेंटिना हिला तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले, परंतु तेथे डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मायणा-कुडतरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

फरारी संशयित तीन तासांत जेरबंद

खून केल्‍यानंतर संशयित मारिओने आपल्‍या आल्‍टो गाडीने पळ काढला. मात्र पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्‍या साहाय्‍याने माग काढत अवघ्‍या तीन तासांत त्‍याला जेरबंद केले.

पोलिसांनी त्‍याच्‍याविरोधात भादंसंच्‍या 302 (खून) आणि 324(शस्त्राचा वार करून जखमी करणे) या कलमांखाली गुन्‍हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT