Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: थर्मासमध्ये चहा नव्हे, गांजा-चरस! कोलवाळ कारागृहात महिला सुरक्षा रक्षकच जाळ्यात; धक्कादायक प्रकार उघडकीस

236 Grams Ganja Charas Goa: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात अमली पदार्थ पोहोचवण्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात अमली पदार्थ पोहोचवण्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या महिला सुरक्षारक्षक आशा चोडणकर यांना २३६ ग्रॅम गांजा व चरससह पकडण्यात आले. कारागृह प्रशासनाने त्यांना कोलवाळ पोलिसांच्या स्वाधीन केले असून, पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

मंगळवारी (ता. १८) सकाळी सुमारे ८.१० वाजता चोडणकर ड्युटीवर रुजू होण्यासाठी कारागृहात आल्या होत्या. तिसऱ्या प्रवेशद्वारावर नियमित तपासणी सुरू असताना त्यांच्या थर्मासमध्ये २३६ ग्रॅम गांजा लपविल्याचे आढळून आले. कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ रोखले. मात्र, पुढील प्रक्रियेदरम्यान कर्मचाऱ्यांची नजर चुकवून त्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. कारागृह प्रशासनाने तत्परतेने पाठलाग करून त्यांना पुन्हा ताब्यात घेतले.

गांजा कुठून आला? कोणत्या कैद्यापर्यंत पोहोचणार होता?

जप्त केलेला अमली पदार्थांचा साठा कारागृहातील कोणत्या कैद्यापर्यंत पोहोचविला जाणार होता आणि तो बाहेरून कुठून आणण्यात आला, याचा तपास पोलिस करीत आहेत. या प्रकरणात कारागृहातील आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.

लॉकरमध्ये चरस, ३ मोबाईल, एटीएम

चोडणकर यांच्या लॉकरची झडती घेतली असता २ ग्रॅम चरस, तीन मोबाईल फोन, विविध बँकांची तीन एटीएम कार्डे, पॅनकार्ड आणि मतदार ओळखपत्र आढळले. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारागृह प्रशासनाने तक्रार दाखल करून चोडणकर यांना कोलवाळ पोलिसांच्या स्वाधीन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT