Canara Bank fraud Dainik Gomantak
गोवा

मडगावातील 'कॅनरा बॅंक' फसवणूकप्रकरणी महिलेला अटकपूर्व जामीन

6 कोटी 19 लाख रुपयांचा गंडा

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: मडगाव येथील कॅनरा बँक शाखेला 6 कोटी 19 लाख रुपयांचा गंडा घालून फसवणूक केल्या प्रकरणी न्यायालयाने उत्तर गोव्यातील सूरत शिरोडकर मास्कारेन्हस या संशयित महिलेला मडगावच्या सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. हा आदेश न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश इर्शाद आगा यांनी दिला आहे .

मडगाव येथील कॅनरा बँक शाखेच्या सरव्यवस्थापकाने 24 डिसेंबर रोजी या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली होती. भादंसं. 120 बी , 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. हे प्रकरण सीबीआय आणि गुप्तचर संस्था हाताळत असल्याने त्यांच्या वकिलाने हे प्रकरण प्राथमिक स्तरावर असल्याने संशयिताला जामीन नामंजूर करावा,अशी मागणी न्यायालयाकडे केली होती.

यावर तपास यंत्रणेने अर्जदाराला कोणत्याच प्रकारची नोटीस न पाठविल्याने हा अर्ज निकालात काढण्यात यावा आणि अर्जदाराला अटक करायची असल्यास अर्जदाराला आचार संहितेच्या 41 आ या कलमान्वये नोटीस बजावण्याचा निर्देश देण्यात यावा, अशी विनंती अर्जदाराच्यावतीने न्यायालयाकडे करण्यात आली.

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाच्या निदर्शनास आले की, या प्रकरणाचा तपास प्राथमिक स्तरावर असून कोठडीत ठेवून अर्जदाराची चौकशी केली पाहिजे, यासाठी तपास यंत्रणेने कोणताच मुद्दा मांडलेला नाही.

हे प्रकरण फसवणुकीचे असल्याने आणि भारतीय दंड संहितेच्या 420 कलमाखाली नोंद आहे. प्रस्तुत प्रकरणातील संशयित एक महिला असल्याने हा अर्ज मंजूर करताना अर्जदाराला अटक करण्याचा विचार तपास यंत्रणेचा असेल तर 24 तास आधी तिला नोटीस जारी करण्यात यावी, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa: 'चोला' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध; भगवे कपडे, तुळस- रुद्राक्षाच्या सीनवर आक्षेप, यॉटवर ज्येष्ठ अभिनेत्यासमोर राडा

Goa Live News: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! सायबर घोटाळ्याप्रकरणी 24 जण अटकेत!

Kartik Aaryan: ना गाजावाजा न कसाला धिंगाणा; कार्तिकने गोव्यात शांततेत साजरा केला वाढदिवस पाहा Photo, Video

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात चहा, कॉफीसारखे गरम पेय का टाळावेत?

Cash for Job Scam: त्या 'मॅडम'ला पकडून देण्याचा गोमंतकीयांनी निर्धार केलाय! Cash For Job प्रकरणावरुन सरदेसाई पुन्हा बरसले

SCROLL FOR NEXT