Woman Empowerment Dainik Gomantak
गोवा

Woman Empowerment: हाती कथलीचा वाळा..

किती कप्पे मनाचे, त्यात अजून छोटे कप्पे, यात दडलेली बिजे, अधिकसे अनुभव सुखद किंवा दु:खद.

गोमन्तक डिजिटल टीम

आसावरी कुलकर्णी

मुंग्या आलेल्या किंवा बधिर झालेल्या डोक्याने लिहायचे कसे? शब्द लेखणीतून उतरताना भांडताहेत, एकमेकांशी गुंतून ‘झांगडगुत्ता’ की काय तो झालाय त्यांचा, आणि डोक्याचे दही. विरजणासाठी भेटलेल्या सखीचे बोलके डोळे आणि मुकी जीभ.

मागे म्हटल्या प्रमाणे या विषयावर प्रमाणबद्धता असावी म्हणून सर्वेक्षण सुरू केले आणि मुंग्यांचे घर उभा छेद घेऊन बघायचा अनुभव आला. किती कप्पे मनाचे, त्यात अजून छोटे कप्पे, यात दडलेली बिजे, अधिकसे अनुभव सुखद किंवा दु:खद. तिला किती बोलायचे आहे बरे? मध्यंतरी एक चित्रपट आला होता, ज्यात नायकाला स्त्रियांच्या मनातले ऐकू येते. अशी देणगी मला मिळायला हवी होती.

असो! तर आपण या विषयाकडे वळू. तूर्तास नारी समता, समानता ,सबलीकरण अशा बोथट झालेल्या शब्दांना जरा दूर करून पाहू. हाउसवाइफ किंवा गृहिणी हे वर्षानुवर्षे चालत आलेले बिनपगारी पद आहे.

खरे तर गृहस्थी चालविण्यासाठी नकळत झालेली ती कामाची विभागणी आहे. पुरुषाने अर्थार्जन करावे आणि स्त्रीने घर सांभाळावे, हा नकळत, न सांगता झालेला करार आहे, अशी संकल्पना आपल्याच नव्हे जगात सगळीचकडे आहे.

पण २१व्या शतकात अर्थ बदलले आहेत तशा भावनाही बदलल्या आहेत. ‘गृहिणी पद हे पगारास पत्र असलेले पद आहे आणि स्त्रीला वाटले तर ती अशा प्रकारच्या पगाराची मागणी करू शकते’, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे.

याच निमित्ताने एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून काही निरीक्षणे आणि निष्कर्ष समोर आले. या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या 95 टक्के महिलांना गृहिणीपद हे पगारी काम आहे, असे मुळीच वाटत नाही.

काही कारणांमुळे म्हणजे योग्य शिक्षण, घरातून परवानगी किंवा स्वखुशीने नोकरी मिळाली नसल्यामुळे पूर्ण वेळ गृहिणी म्हणून राहावे लागते, असे 60 टक्के महिलांनी सांगितले. 80 टक्के महिलांना घर चालविणे ही आपलीच जबाबदारी आहे असे वाटत.

62 टक्के महिलांना अर्थार्जन न करण्याचे वाईट वाटते. जवळजवळ 98 टक्के स्त्रियांना योग्य तो मान मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.

35 टक्के स्त्रिया गृहिणी असूनही काही ना काहीतरी करून संसाराला हातभार लावतात. 87 टक्के स्त्रियांना आत्ताच्या सामाजिक व्यवस्थेत थोडा तरी बदल व्हावा, असे वाटते. 30 टक्के महिलांना, महिलाविषयक कायदे निदान माहीत तरी आहेत. 56 टक्के स्त्रिया विविध सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत. वेगवेगळ्या स्तरातल्या स्त्रियांचा यात सहभाग आहे. उच्च किंवा अति उच्च पातळीवरच्या स्त्रियांचा यात विचार केलेला नाही.

सर्वेक्षणातून निघालेल्या निष्कर्षातून बऱ्याच गोष्टी समोर आल्या. खरे तर नवीन विषयांची बिजे यातून रोवली गेली. आरोग्य, घरगुती हिंसाचार अशा विषयावरही चर्चा झाली, पण ते वेगळ्या लेखात मांडले जाईल.

गृहिणी पद हे कौशल्यपूर्ण असेच काम आहे. घर संभाळण्यासाठी लागणार हे कौशल्य स्त्रीला ती पाच ते सहा वर्षांची असल्यापासून शिकवले जाते. गृहकृत्यदक्ष हा फक्त लग्नाळू मुलीचा गुण नसून, आयुष्यभर गृहिणीपद सांभाळण्यासाठी लागणारी ती पात्रता आहे.

तुम्ही भलेही डॉक्टर, इंजिनिअर असा. घराचा उंबरठा ओलांडला की तुम्ही या कामात तरबेज असलेच पाहिजे. या परीक्षेत १०० टक्के गुण त्याच स्त्रिया मिळवतात ज्या मनातून हे सगळे स्वीकारतात. घर चालविणे ही पारंपरिक जबाबदारी आहे असे ८० टक्के महिलांनी सांगितले म्हणजेच मनापासून स्वीकारलेले आहे.

खरे तर गृहिणी म्हणून राहण्यात वावगे काय? एका अर्थाने एकाने अर्थार्जन करावे आणि दुसऱ्याने घर सांभाळून राहावे ही साधी सोपी व्यवस्था. मग का बरे नेहमीच गोंधळ होतो. काय नेमके खटकते फक्त गृहिणी असण्यात.

पाहूया पुढच्या लेखात

तोपर्यंत अवती भवती तुम्हीही ठाव घ्या अशाच प्रश्नांचा. बघा काही सापडताहेत का कप्पे, अंतर्मनातले...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: घरबसल्या बघा 'इफ्फी'चा सोहळा! Live Streaming साठी प्रसारभारतीने दिली 'ही' खास सुविधा..

Morjim: मोरजीत 'कॅसिनो'ला थारा नाही! आमदार आरोलकरांचा स्थानिकांना पाठिंबा; परवाने मागे घ्‍यायची मागणी

Viriato Fernandes: 'मोठ्या माशांची नावे अजूनही बाहेर येत नाहीत', Cash For Job विषय संसदेच्‍या चर्चेत आणू; विरियातोंचे मोठे विधान

IFFI 2024: 'इफ्‍फी'साठी लखलखाट! 600 आकाशकंदीलांनी सजणार दयानंद बांदोडकर मार्ग

Ramesh Tawadkar: 'आता गावडेंवर काय कारवाई होते पाहू'; मंत्र्यांच्या कामगिरीबाबत तवडकरांचा सरकारला घरचा आहेर

SCROLL FOR NEXT