रावणफोंड येथे जिन्यावरून पडल्‍याने महिलेचा दुर्दैवी मृत्‍यू Dainik Gomantak
गोवा

रावणफोंड येथे जिन्यावरून पडल्‍याने महिलेचा दुर्दैवी मृत्‍यू

नालंदा अपार्टमेंटमधील आपल्या घरी कपडे सुकविण्यासाठी ती जिने चढून वर गेली असता खाली पडली

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: कपडे सुकत घालताना तोल जाऊन खाली कोसळल्याने रावणफोंड येथील अंकिता थिम्बोडिया (29) या महिलेचा मृत्यू झाल्याची तक्रार मडगाव पोलिसांत (Margao) नोंद झाली आहे. मिळालेल्‍या माहितीनुसार, गुरुवार दि. 9 डिसेंबर रोजी ही दुर्घटना घडली.

नालंदा अपार्टमेंटमधील आपल्या घरी कपडे सुकविण्यासाठी ती जिने चढून वर गेली असता खाली पडली, असे तिचा नवरा सागर थिम्बोडिया याने सांगितले. जखमी अवस्‍थेत तिला तात्काळ मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्‍यान, मयत महिलेने नुकताच एका मुलाला जन्म दिला होता.

प्रसूतीनंतर तिला अशक्तपणा आला होता. कदाचित यामुळेच ती तोल जाऊन खाली पडली असावी असे नवऱ्याचे म्‍हणणे आहे. हा मृत्यू अनैसर्गिक म्हणून नोंद झाला असला तरी तिच्या लग्नाला सात वर्षे पूर्ण न झाल्याने तपास दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar 2026: नशिबाची साथ अन् अफाट पैसा! शुक्राचा स्वतःच्याच नक्षत्रात महाप्रवेश! 'या' 5 राशींचे नशीब पालटणार; राजासारखे जीवन जगणार

Droupadi Murmu: श्री जगन्नाथ दर्शनार्थ पुरीच्या विशाल पथावर...

खरी कुजबुज: उच्चशिक्षितही फसतात

Goa Investigation: सॅम्युअल ब्रागांझा मृत्यू प्रकरणाचा तपास अद्याप रखडलेलाच; आत्महत्येच्या प्राथमिक संशयानंतरही पडद्यामागचे गूढ वाढेना

NSUI: बालरथांचे 'सुरक्षा ऑडिट' करावे! 'एनएसयूआय' आक्रमक, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको

SCROLL FOR NEXT