वरकटो-सांगे (Sange) येथील दुकानवजा घरात एकट्याच राहणाऱ्या भारती राजेंद्र सामंत (58) (Bharti Rajendra Samant) या महिलेचा मृतदेह घरात आढळल्याने खळबळ उडाली Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: सांगेत चोरीच्या हेतूने महिलेचा निर्घृण खून

पोलिसांनी (police) दुकानाच्या शटरचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. तर त्यावेळी भारती (Bharti Rajendra Samant) घरात मृत अवस्थेत पडलेल्या दिसून आल्या. त्यांच्या नाकातून रक्त येत होते.

दैनिक गोमन्तक

सांगे: वरकटो-सांगे (Sange) येथील दुकानवजा घरात एकट्याच राहणाऱ्या भारती राजेंद्र सामंत (58) (Bharti Rajendra Samant) या महिलेचा मृतदेह घरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. सकृतदर्शनी चोरांशी झालेल्या झटापटीवेळी गळा आवळल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा संशय कुटुंबासोबत ग्रामस्थांनी व्यक्त केला. राज्यात वारंवार होणाऱ्या गुन्ह्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेविषयी प्रश्न उपस्थित होत आहे.

शेजाऱ्यांनी त्यांच्या मोबाईलवर फोन लावला असता, मोबाईल वाजत होता. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगे पोलिसांना पाचारण करण्यात केल. पोलिसांनी दुकानाच्या शटरचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. तर त्यावेळी भारती घरात मृत अवस्थेत पडलेल्या दिसून आल्या. त्यांच्या नाकातून रक्त येत होते. शिवाय त्यांच्या दोन्ही हातांवर रक्ताचे डाग आढळून आले.

सांगे पोलिसांनी (police) या घटनेचा पंचनामा करुन ठसे तज्ज्ञांनाकडे दिले आहेत. तसेच मृतदेह देखील तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेचा तपास सांगेचे पोलीस निरीक्षक प्रवीण गावस करत आहेत. पोलीस उपनिरीक्षक हरीश देसाई यांनी पंचनामा केला. घटनास्थळी माजी आमदार सुभाष फळदेसाई, उगेचे माजी सरपंच तसेच प्रतिभा सामंत यांचे दीर दीनानाथ सावंत उपस्थित होते.

जोरदार झटापट, पायात चपला तशाच

घराचे दरवाजे आतून बंद होते. पण टेरेसवरील दरवाजा खुला असल्याने यावरु चोरट्यांनी घराजवळ असलेल्या शौचालयाच्या लोखंडी पाईपवरुन छपरावर प्रवेश केला, तेथून उघड्या दरवाज्यातून चोरांनी सहज प्रवेश केला असण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर चोरांनी टेरेसवरुनच पलायन केले असावे. असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास म्हणजे त्या झोपण्याआधीच त्यांच्याशी झटापट झाली असावी. कारण त्यांच्या पायात चपला तशाच होत्या. त्यावरुन त्या झोपलेल्या नसाव्यात. चोरांनी नेमके किती दागिने आणि रोकड लंपास केली आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT