Winter Weather Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोव्यात धुके आणि ऊन्हाचा खेळ; हवामान बदलामुळे शेतकरी चिंतेत

Goa Winter: पुढील पाच दिवस राज्यातील हवामान कोरडे राहणार असून पहाटे धुके आणि दव पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. कमाल तापमानात सामान्य तापमानाच्या तुलनेत १.९ अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Winter Update

पणजी: आठवड्याभरापासून थंडीला सुरुवात झाली आहे. पहाटे धुके आणि दवही मोठ्या प्रमाणात पडत आहे. परंतु आज सकाळी ९ पर्यंत मोठ्या प्रमाणात धुके दाटले होते, तसेच वातावरण देखील ढगाळ वाटत होते, मात्र सकाळी दहा नंतर आकाश स्वच्छ होऊन कोवळी सूर्यकिरणेही दाखल झाली असून किमान तापमानात मात्र सातत्याने वाढ होत आहे. काहीसा थंडीचा जोर मंदावला आहे.

सोमवारी राज्यात १८.६ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली, तर आज (शनिवारी) २१.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे राज्यात किमान तापमानाच्या तुलनेत १.१ अंश सेल्सिअस तापमानात वाढ झाली आहे. मागील आठवड्याभरात सातत्याने किमान तापमानात वाढ होत असल्याने केवळ ग्रामीण भागात खासकरून घाटालगतच्या भागात थंडी जाणवत आहे.

पुढील पाच दिवस राज्यातील हवामान कोरडे राहणार असून पहाटे धुके आणि दव पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. कमाल तापमानात सामान्य तापमानाच्या तुलनेत १.९ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. आज किमान ३१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

काजूवर परिणाम

राज्यात मोठ्या प्रमाणात थंडीला सुरुवात झाल्याने काजू-आंबा शेतकऱ्यांचा उत्साह वाढला होता. परंतु सातत्याने होणारे हवामान बदल आणि आता पहाटे मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या धुक्यामुळे ऐन बहरात असलेला काजू आंब्याचा मोहोर करपू शकतो, त्यामुळे राज्यातील शेतकरी अतिशय चिंतातुर झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT