Sulakshana Sawant Dainik Gomantak
गोवा

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आणण्याचा निर्धार; नव्या जबाबदारीनंतर पहिल्यांदाच बोलल्या गोवा मुख्यमंत्र्यांच्या पत्नी

Sulakshana Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यावर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

Pramod Yadav

पणजी: महाराष्ट्रात भाजप नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करणार. महाराष्ट्रात काम करताना यापूर्वीच्या अनुभवाचा फायदा होईल, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी व्यक्त केले आहे.

सुलक्षणा सावंत यांची महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चा सहप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नुयुक्तीनंतर त्या पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

महिला मोर्चाच्या सहप्रभारीपदी नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी भाजप नेतृत्वाचे आभार मानले. इतर चार महिलांच्या सोबत आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकत्र काम करुन, राज्यात भाजप नेतृत्वातील महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार, असे सुलक्षणा सावंत म्हणाल्या.

गोवा महिला मोर्चा राज्यप्रभारी असणाऱ्या सुलक्षणा सावंत यांच्याकडे महाराष्ट्रात देखील सहप्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

अनुभवाचा फायदा होईल

यापूर्वी महाराष्ट्र , गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये काम करण्याचा अनुभव घेतला आहे. या राज्यांमधील कामाचा अनुभव महाराष्ट्रात कामाला येईल, असे मत सुलक्षणा सावंत यांनी व्यक्त केले.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ठेवलेला विश्वास सार्थ ठरविताना महाराष्ट्र राज्यात भाजपचे युतीबरोबर सरकार आणण्यासाठी काम करणार. आपल्याबरोबर नियुक्त करण्यात आलेल्या चारही महिला मिळून महाराष्ट्रात भाजपला सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

SCROLL FOR NEXT