Railway Dainik Gomantak
गोवा

Goa: वेलसाव येथे कोळसा वाहतूकीसाठी रेल्वेचे दुपदरी होणार ?

याची चाहूल गावकऱ्यांना लागताच शेकडो ग्रामस्थ रेल्वे ट्रॅकवर एका हाकेत धावून आले.त्यांनी रेल्वे पोलीस, रेल्वे अधिकारी यांना हाकलून लावण्यास सुरुवात केली.

दैनिक गोमन्तक

मोल्लो पाले वेलसाव येथे पुन्हा एकदा रेल्वे अधिकारी व तेथील ग्रामस्थांमध्ये राडा निर्माण झाला. शेकडो ग्रामस्थांनी रेल्वे ट्रॅक वर उतरुन आरव्हीएनएलचे सर्वेक्षणाचे काम बंद पाडून रेल्वे अधिकारी व रेल्वे कंत्राटदारांना हाकलून लावले.

रेल्वे (Railway) दुपदरी करण्याचा विषय सध्या गोव्यात गाजत असून कोळसा वाहतूक करण्यासाठी रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाच्या नावाखाली जागा बळकावून खाजगी जमिनीवर अतिक्रमण करून रेल्वे दुहेरी मार्गाचे काम सध्या जोरात चालू आहे. या दुहेरी मार्गाला मुरगाव (Margao) तालुक्यातून मोल्लो पाले वेलसाव येथील ग्रामस्थांकडून कडवा विरोध होत असून कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या वडिलोपार्जित जागेवर रेल्वेला अतिक्रमण करू देणार नाही.

या कामासाठी आमची पुरातन काळातील घरे उद्ध्वस्त होईल. आम्ही आमची पुरातन घरे तसेच वडिलोपार्जित जागेला तडा जाऊ देणार नाही. असा ठाम निर्णय या लोकांनी घेऊन रेल्वेद्वारे चालवलेल्या बेकायदेशीर कामाला येथील ग्रामस्थांनी कडवा विरोध केला आहे. रेल्वेद्वारे कित्येक वेळा या जागेवर बेकायदेशीर अवैध सर्वेक्षणाला सुरुवात केली. परंतु त्या त्या वेळेला येथील ग्रामस्थांनी या कामाला कडवा प्रतिकार करून आर बी एन एल चे अवैध सर्वेक्षणाचे काम बंद पाडून संबंधित रेल्वे अधिकारी व रेल्वे कंत्राटदारांना त्या जागेवरून हाकलून लावले.

काल संध्याकाळी सशस्त्र रेल्वे पोलिस सुरक्षा दलाच्या जवानांसह येऊन रेल्वेच कंत्राटदाराने अवैध सर्वेक्षणाचे काम चालू केले होते. या सर्वेक्षणाचे काम बंद पाडून आर बी एन एल च्या कंत्राटी कामगारांना तसेच त्यांच्याबरोबर आलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना तिथून हाकलून लावले होते. दरम्यान एवढे मोठे रामायण घडले असता आज रेल्वेने पुनरावृत्ती करताना सकाळी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांचा मोठा फौजफाटा आणून काम चालू केले. याची चाहूल गावकऱ्यांना लागताच शेकडो ग्रामस्थ रेल्वे ट्रॅकवर एका हाकेत धावून आले.त्यांनी रेल्वे पोलीस, रेल्वे अधिकारी यांना हाकलून लावण्यास सुरुवात केली.

या वेळी राडा निर्माण झाला. पोलीस आजही घटनास्थळी दाखल झाले होते. रेल्वे पोलीस तसेच गोवा पोलीस यांचे गावकऱ्यांपुढे काही एक चालले नाही. गावकऱ्यांनी आज पुन्हा एकदा रेल्वे अधिकारी तसेच रेल्वे पोलिसांना ठणकावून सांगितले की आमच्या वडिलोपार्जित जागेला हात लावाल तर खबरदार असा इशारा त्यांनी दिला. पोलीस घेऊन या, तर मिलिटरी फोर्स घेऊन या, आम्ही आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेम्बापर्यंत वडिलोपार्जित जागेचे रक्षण करणार असल्याचे गावकऱ्यांनी ठणकावून सांगितले व रेल्वे अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर, रेल्वे पोलिसांना आज पुन्हा एकदा हाकलून लावले.

दरम्यान दक्षिण पश्चिम रेल्वेद्वारे कामावर घेतलेल्या रेल्वे विकास निगम लिमिटेड कंत्राटदारांनी केलेले बेकायदेशीर सीमांकन वेलसाव पंचायत सदस्य आणि वेलसाव ग्रामस्थांसह गोयचो एकवोट यांनीही पुढाकार घेऊन काम थांबवले व ग्रामस्थांच्या या लढ्याला बळ दिले. गोयचो एकवोटचे संयुक्त सचिव ओलेन्सियो सिमोस यांनी सांगितले की रेल्वे विकास निगम लिमिटेड अधिकारी हे खाजगी प्राधिकरण आहे जे सरकारी विभागाप्रमाणे वागत आहेत आणि मालक, संबंधित अधिकारी किंवा पंचायत असलेल्या स्थानिक संस्थेला माहिती न देता गावकऱ्यांच्या खाजगी मालमत्ता आणि घरांमध्ये बेकायदेशीरपणे अतिक्रमण करत आहेत.

रेल्वे विकास निगम लिमिटेड अधिकाऱ्यांनी भूसंपादन न करता दुहेरी ट्रॅकिंगसाठी जमिनीचे बेकायदेशीरपणे सीमांकन सुरू केले आहे. आमच्या मालमत्तेत जबरदस्तीने प्रवेश केला आहे आणि बार्ब वायरचे कुंपण बसवले आहे ज्यामुळे आमच्या घरात आणि मालमत्तेमध्ये प्रवेशाचा आमचा अधिकार रोखला जात आहे. 2008 सालापासून पासून भूसंपादनाला विरोध करण्यात आला होता.आता पुन्हा एकदा जमीन मालकांनी रेल्वेच्या दुहेरीकरणासाठी त्याच भूसंपादनाला विरोध केला आहे.

गोयचो एकवोटचे संस्थापक इंजि. रॉड्रिग्स यांनी वेलसाव किंवा गोव्याच्या लोकांच्या इच्छेविरुद्ध असा बेकायदेशीर आणि सक्तीचा विकास घडवून आणल्यास गोंयचो एकवोट हजारो लोक रस्त्यावर उतरण्यास भाग पाडले जाईल, असा इशारा ऑर्विल डौराडो रॉड्रिग्स यांनी सरकारला दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT