Goa Dainik Gomantak
गोवा

कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनचा आराखडा पुढच्या वर्षीच 'फायनल' होणार?

कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनच्या (CZMP) आराखड्यामध्ये आवश्यक दुरुस्त्या करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

दैनिक गोमन्तक

Goa: कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनच्या (CZMP) आराखड्यामध्ये आवश्यक दुरुस्त्या करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. परिणामी आराखडा अंतिम करण्यासाठी दिलेली 31 डिसेंबरची मुदत चुकण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, गोवा (Goa) कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (GCZMA) आणि नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट (NCSCM) यांनी गठन केलेली तज्ञांची (Expert) समिती आराखड्यामध्ये बदल करत आहे.

या विलंबाचा अर्थ असा होतो की, गोव्याच्या किनारपट्टी आणि किनारी परिसंस्थेच्या वास्तविक संरक्षणासाठी (Protection) मार्ग प्रशस्त करण्यासाठी अध्याप कोणतीही योजना नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, दुरुस्त केलेला आराखडा नंतर गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (GCZMA) कडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. पुढे तो नॅशनल कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (NCZMA) कडे जाईल. NCZMA नंतर आराखडा केंद्रीय पर्यावरण (Environment), वन (Forest) आणि हवामान (Climate) बदल मंत्रालया (MoEF&CC) कडे पाठवला जाईल.

"ही प्रक्रिया 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार नाही. आम्हाला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) समोर आहे त्या स्थितीत जावे लागेल," सूत्रांनी सांगितले. गोव्याची पहिली CZMP 1996 मध्ये तयार करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT