Bicholim nana Patole  Dainik gomantak
गोवा

गोमंतकीय जनता भाजपला सत्तेपासून दूर करणार, पटोले यांचा दावा

काँग्रेसचे डिचोलीतील उमेदवार मेघ:श्याम राऊत यांच्या प्रचारार्थ मंगळवारी दुपारी पाटोळे डिचोलीत आले होते

दैनिक गोमन्तक

डिचोली : खासगीकरणाच्या नावाखाली भाजपने देश विकण्याचे षडयंत्र रचले आहे. अशा या अन्यायकारक भाजपला सत्तेवर आणण्याची चूक केली आहे. याची जाणीव आता जनतेला झाली आहे. अन्याय व्यवस्थेला कंटाळलेली जनता यावेळी नक्कीच भाजपला सत्तेपासून दूर लोटणार आहे. असा दावा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. काँग्रेसचे डिचोलीतील उमेदवार मेघ:श्याम राऊत यांच्या प्रचारार्थ मंगळवारी दुपारी पटोले डिचोलीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यातील बेरोजगारी सोडविण्यासाठी भाजपने (BJP) कोणतीच उपाययोजना केलेली नाही. 'कोविड' काळात जनतेचे प्राण वाचविण्याचे सोडून उलट जनतेच्या जीवाशी खेळले. अशी टिका पटोले यांनी केली. ज्या स्व. मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात भाजपला सत्ता मिळवून दिली, त्याच भाजपने आज पर्रीकरांच्या कुटुंबाला वाळीत टाकले आहे. अशी टिकाही पटोले यांनी केली. यावेळी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या (Congress) विविध समित्यांचे पदाधिकारी तसेच उमेदवार मेघ:श्याम राऊत, प्रदेश काँग्रेस समितीचे नझीर बेग, डिचोली गट काँग्रेसचे अध्यक्ष नितीन परब, महिला गट काँग्रेसच्या अध्यक्ष मारिया सौझा, बालाखान गोरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री पराभूत होणार

गोव्यातील जनता भाजपला कंटाळली असून, गोमंतकीय जनता या सरकारला यावेळी सत्तेपासून नक्कीच दूर करतील. भाजपच्या दिग्गजांसमोर कडवे आव्हान निर्माण झाले असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत साखळीतून पराभूत होतील. असा दावा नाना पटोले यांनी यावेळी केला. सर्वप्रथम पाटोळे यांनी जुन्या बसस्थानकावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवरायांना अभिवादन केले. डिचोली (Bicholim) गट काँग्रेसतर्फे नाना पटोले यांचे स्वागत करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT