Garbage Problem File Photo
गोवा

Goa Government: सोनसोडोबाबत आराखडा तयार करणार

समस्यांवर चर्चा : गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाच्‍या बैठकीत निर्णय

दैनिक गोमन्तक डिजिटल

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोनसोडो कचरा प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने बोलाविलेल्या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर, समस्यांवर विचारविनिमय करण्‍यात आला. तसेच या समस्या सोडविण्यासाठी आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लेविन्सन मार्टिन्स, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, मुख्याधिकारी मान्‍यूएल बार्रेटो, नगरपालिकेचे अभियंते, अग्निशमन दलाचे अधिकारी आर. हळदणकर, महामंडळाने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराचे प्रतिनिधी, संबंधित खात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सोनसोडो नागरिकांच्या वतीने उच्च न्यायालयात रॉक मास्कारेन्हस यांनी जनहित याचिका सादर केली होती. त्यासंदर्भात उच्च न्यायालयाने संबंधितांची बैठक बोलाविण्याचा आदेश दिला होता.

सोनसोडो कचरा प्रकल्पात आग विझविण्यासाठी पुरेशा साधनसुविधा उपलब्ध आहेत का? सोनसोडो प्रकल्पात साचलेला कचरा केव्‍हा उचलला जाईल?, त्‍यासाठी उपाय योजिले आहेत का? तसेच कंत्राटदाराला तेथून आरडीएफ काढायला आणखी किती अवधी लागेल? अशा अनेक प्रश्र्नांवर बैठकीत चर्चा झाली.

सोनसोडो कचरा प्रकल्पात नगरपालिकेने लवकरात लवकर अग्निरोधक सुविधा उपलब्ध करणे, रबरी नळीची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे आर. हळदणकर यांनी सुचविले. प्रकल्प परिसरात सुरक्षा कर्मचाऱ्यांचा पहारा ठेवणे व सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे महत्वाचे असल्याचे बैठकीत ठरविण्‍यात आले. नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी आपण स्वत: परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असल्याचे स्पष्ट केले.

कर्नाटकातील सिमेंट कंपन्यांशी करार

सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्पात गेल्‍या कित्‍येक महिन्‍यांपासून जो कचरा गोळा झाला होता, त्याचे रिमेडिएशन पूर्ण झाल्याचे व जो नवीन कचरा गोळा झाला आहे, तो उचलून नेण्यासाठी कंत्राटदाराने कर्नाटकातील सिमेंट कंपन्यांशी करार केला आहे, असे गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लेविन्सन मार्टिन्स यांनी सांगितले.

सिमेंट कंपन्यांना दररोज 200 टन कचरा पुरविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शिवाय जो इतर कचरा गोळा झाला आहे, तो उचलण्यासाठी नगरपालिका कंत्राटदाराची नियुक्ती करणार आहे. तसेच प्रकल्पातील रस्ता, शेडची दुरुस्ती करण्यासाठी कामाचा आदेश काढला असल्याची माहिती नगरपालिकेच्या प्रतिनिधींनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT