लहान-मोठे असे अनेक प्रकल्प असलेले साखळी हे आजच्या क्षणाला एक विकसनशील शहर आहे. येणाऱ्या काळात नगरपालिकेच्या साहाय्याने विकास प्रक्रिया जलद करून साखळीला लहान शहरांमध्ये क्रमांक एकचे शहर बनविणार आहे.
पालिका आमची नव्हती तरी आपण विकासकामे बंद केली नव्हती. याच कारणामुळे साखळीतील जनतेने आज आम्हाला भरघोस मतांचा पाठिंबा दिला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
नगरपालिका निवडणुकीत भाजपला साखळीत मिळालेल्या भरघोस यशाच्या पार्श्वभूमीवर आयोजित विजयोत्सव स्नेहमेळावा व नगरसेवक अभिनंदन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
रवींद्र भवन परिसरात झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, भाजप साखळी मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, सरचिटणीस कालिदास गावस, नवनिर्वाचित. नगरसेवक यशवंत माडकर, निकिता नाईक, सिद्धी प्रभू पोरोब, रश्मी देसाई, विनंती पार्सेकर, रियाझ खान, आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, दीपा जल्मी, अंजना कामत व इतरांची उपस्थिती होती.
दरम्यान, या स्नेहमेळाव्यात सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गोपाळ सुर्लकर यांनी स्वागत केले. संजय नाईक यांनी सूत्रसंचालन केले तर कालिदास गावस यांनी आभार मानले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.