Ramesh Shinde Of Hindu Janjagruti Samiti Dainik Gomantak
गोवा

Goa News: दारुच्या आहारी गेलेला भाविक मंदिरात जाणार का? हिंदू जनजागृती समितीचा सवाल, निर्णयाचा निषेध

Goa News: निर्णय गोवा सरकारने तात्काळ रद्द करावा. तसेच उत्तर प्रदेश प्रमाणे धार्मिका पर्यटन वा अन्य योग्य मार्गातून निधी गोळा करावा - रमेश शिंदे

Pramod Yadav

शाळा आणि मंदिरे यांच्या 100 मीटर अंतरात वाढीव शुल्क आकारून दारुची दुकाने सुरु करण्याची अनुमती देण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गोवा सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यात आला.

सरकारने या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

कॅसिनोमुळे युवा पिढी बरबाद होत आहे आणि आता शाळा आणि मंदिरे यांच्या 100 मीटर अंतरावर दारूच दुकाने चालू करणे कितपत योग्य ठरणार आहे? हिंदू भाविक जर दारूच्या आहारी गेलेला तो मंदिरात जाणार का? सरकारच्या या निर्णयामुळे पर्यटन क्षेत्र वृद्धींगत होणार आहे का? असे सवाल हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी उपस्थित केले.

महसुलात वृद्धी करायची असल्यास गोवा सरकारने उत्तरप्रदेश सरकारप्रमाणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असा सल्लाही शिंदे यांनी दिला.

गोव्यात प्राचीन मंदिरे, संस्कृती असतांना दारूच्या माध्यमातून पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेला निर्णय निदंनीय आहे. वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही गोवा सरकारच्या या निर्णयाचा निषेध करतो आणि गोवा सरकारने या निर्णयावर फेरविचार करावा, अशी मागणी शिंदे यांनी केली.

तसेच, भारतातील अन्नपदार्थांस प्रमाणिकरण देणारी संस्था ‘FSSAI’ यांच्या आदेशानुसार शाळाच्या जवळ फास्ट फूड विक्र उभारता येता नाही. शाळांच्या परिसरात फास्ट फूडला विक्री केंद्राला विरोध करणारी सरकार दारूच्या विक्रीच्या दुकानांना कशी परवानगी देते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT