Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: पेडणेच्या आमदारांवरही आता कारवाई केली जाणार काय?

Goa Politics: काँग्रेसचा सवाल : आवश्‍यक परवान्यांविना बंगल्याची उभारणी

दैनिक गोमन्तक

Goa Politics: पेडणे तालुक्यातील आमदाराने आठ हजार चौरस मीटर जागेत जो बंगला उभारला आहे. त्या बंगल्याच्या बांधकामासाठी आवश्‍यक असलेली कन्व्हर्जन सनद, नगर नियोजन प्राधिकरणाची (टीसीपी) परवानगी, पंचायतीची परवानगी असे काहीही नसताना आमदाराने बंगला उभारला आहे.

नगर नियोजनमंत्र्यांनी जशी आमदार जीत आरोलकर यांच्याबाबत कारवाईची भाषा केली आहे. तशी पेडणे आमदारांच्या बंगल्यावर नगर नियोजनमंत्री, मुख्यमंत्री कारवाई करून तो जमीनदोस्त करणार काय, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते संजय बर्डे यांनी मंगळवारी (ता.१०) पत्रकार परिषदेत केला.

पेडणे तालुक्यातील विभागीय नियोजन आराखडा (झोनिंग प्लॅन) तूर्त नगर नियोजनमंत्र्यांनी स्थगित ठेवला आहे. तालुक्यातील जनतेने हा आराखडा रद्द करावा, अशी मागणी लावून धरली आहे. त्यानिमित्त काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेस प्रवक्ते संजय बर्डे, ॲड. जितेंद्र गावकर, प्रणव परब व इतर उपस्थित होते.

ॲड. जितेंद्र गावकर म्हणाले, पेडण्याचा विभागीय नियोजन आराखडा कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांना विचारात न घेता केला गेला. त्या आराखड्याला होणारा विरोध पाहून नगर नियोजनमंत्र्यांनी तो स्थगित ठेवला आहे. खरेतर आम्ही तो रद्द करण्याची मागणी केली आहे. ११ पंचायतींनी या आराखड्यास विरोध केला आहे. अजूनही मोपा विमानतळासाठी दिलेल्या जमिनीचा मोबादला अनेकांना मिळालेला नाही.

प्रणव परब म्हणाले, येथील टॅक्सीचालकांचा प्रश्‍न आहे, आयुष इस्पितळातील नोकऱ्यांचा प्रश्‍न आहे, बेरोजगारांचा नोकऱ्यांचा प्रश्‍न आहे. असे प्रश्‍न असताना विभागीय नियोजन आराखडा करून १ कोटी ४४ लाख चौ.मी. रूपांतरण कोणासाठी, केले जात आहे. भाजप सरकार लोकांविरोधी धोरण राबवीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पेडणे तालुक्यातील १ कोटी ४४ लाख चौ.मी. जागेचे रूपांतरण करण्याचा घाट घातला आहे. तालुक्यातील अजूनही मुंडकारांच्या मालकीचा प्रश्‍न सोडविलेला नाही. आपल्याकडे पेडणेच्या आमदारांनी बांधलेल्या बेकायदेशीर बंगल्याबाबत पुरावे आहेत. आपण ती फाईल मंत्र्यांना देऊ; त्यांनी कारवाई करून दाखवावी.
- संजय बर्डे, काँग्रेस प्रवक्ते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT