Goa Wild Vegetables Dainik Gomantak
गोवा

Wild Vegetables Goa: तायखिळा, ब्राम्ही , फांगला, रानकेळ! औषधी गुणांनी परिपूर्ण रानभाज्या

Monsoon Vegetables Goa: मानव ही निसर्गाची निर्मिती आहे.ज्याने निर्मिती केली आहे त्याचे पालन पोषण करणे हे निर्मात्याचे दायित्व असते. ते दायित्व निसर्ग निभावत आहे.

Sameer Panditrao

सुभाष महाले

मानव ही निसर्गाची निर्मिती आहे.ज्याने निर्मिती केली आहे त्याचे पालन पोषण करणे हे निर्मात्याचे दायित्व असते. ते दायित्व निसर्ग निभावत आहे. मात्र, मानव निसर्गापेक्षा श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या नादात आपले निसर्गाशी असलेले नाते हरवत चालला आहे.

पावसाळ्यात पहिल्या पावसाबरोबर तायखिळा उगवत असतो. त्यानंतर कुड्डकेची भाजी, शिरमंडळीची भाजी, पियूची भाजी, तेणल्याची भाजी, हरपुली,सुये भाजी, तेरा, तेरी, किल्ला, लुती भाजी, गोळीची भाजी, रान केळ, गोटीशेरो, ब्राम्ही भाजी, फांगला अशा अनेक भाज्या फुकटात निसर्गात उपलब्ध आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातील रहिवासी या रानभाज्यांच्या शोधासाठी जिथे या भाज्या उपलब्ध होतात, तिथे जातात.

आपल्याबरोबरच जास्त भाजी मिळाल्यास ती शहरी भागात जाऊन विकून गाठीला चार पैसे जमवतात. काहींचे हे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. याच काळात शेवग्याच्या झाडाला नवी पालवी फुटते. त्या कोवळ्या पानांचीही भाजी करतात. मात्र श्रावणानंतर ही भाजी न खाण्याची परंपरा आहे, याला शास्त्रीय कारण आहे. श्रावणानंतर हा वृक्ष फूल व फळधारणेसाठी तयार होत असतो, त्यावेळी या वृक्षाच्या पानांत काही घटक गरजेपेक्षा जास्त तयार होत असतात. त्यामुळे ती न खाण्याची परंपरा आहे. त्याचप्रमाणे शिरमंडळेची भाजी न खाण्याची परंपरा आहे.

‘रानभाजी ॲम्बेसिडर’

हल्लीच्या काळात शहरीकरणाचा पगडा असूनही पुन्हा एकदा मानव रानभाज्यांकडे वळू लागला आहे, ही एक आशादायी बाब आहे.

त्याचा वसा काणकोणचे आमदार तथा विधानसभेचे सभापती डॉ. रमेश तवडकर चालवत आहेत. गेली तीन वर्षे पुढाकार घेऊन ते रानभाजी महोत्सवाचे राज्यस्तरीय आयोजन करत आहेत. त्याचसाठी त्यांना ‘रानभाजी ॲम्बेसिडर’ हा किताब देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे.

आंकुराची मसालेदार भाजी...

साहित्य - नदी किनारी खाजन शेतीत सापडणारे कोवळे आंकुर, चणे, मिरची,खोबरे, हळदी पावडर, गरम मसाला.

कृती - आंकुराचे कोवळे कोंब स्वच्छ धुवून घ्यावेत. ते बारीक चिरून ते निवळण्यासाठी काही काळ पाण्यात ठेवावेत. त्यानंतर पातल्यात किंवा कुकरमध्ये चणे, चिरलेला कांदा घालून शिजत ठेवावे. गरम मसाला व किसलेले खोबरे, तसेच चिरलेला कांदा कढईत तेल घालून परतून घ्यावा. हे मिश्रण मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यावे.

चणे व आंकुर बऱ्यापैकी शिजल्यानंतर त्यात हे मिश्रण घालून मंद आचेवर शिजू द्यावे. तुम्हाला शाकाहारी आंकुराची भाजी पसंत नसल्यास त्यांत कोळंबी घालून त्याची लज्जत तुम्ही वाढवू शकता. बलराम चॅरिटेबल ट्रस्ट ने शनिवारी काणकोण रवींद्र भवनात १८२ स्वय सहाय्य गटांचा सहभाग असलेल्या रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले त्यानिमित्ताने यांतील काही रानभाज्यांची पाककृती व त्यांचे गुणधर्म...

पौष्टीकता - आंकुर खाऱ्या-गोड पाण्यात वाढत असल्याने त्यांच्या सेवनाने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्यात लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम हे घटक असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Municipal Elections: फातोर्ड्यासह मडगावातील पालिका प्रभागांतही निवडणूक लढवू - विजय सरदेसाई

Marigold Flowers: झेंडू फुलांच्या मागणीत वाढ, लागवडीवर कृषी खात्याचा जोर; 3 वर्षांत 23.77 कोटी फुलांची आयात

Operation Flushout: ऑपरेशन फ्लशआऊट! गोव्यातील हरमल येथून रशियन नागरिकाला अटक

Valpoi: 'बाप्पाला बसवणार कुठे?' वेळूस येथील वृद्धेला मदतीची आस; घर कोसळण्याच्या स्थितीत, मुलाचीही तब्येत बिघडलेली

Goa State Film Festival: वर्षा उसगावकर यांना 'जीवनगौरव पुरस्कार', राज्य चित्रपट महोत्सवाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शुभारंभ

SCROLL FOR NEXT